Join us  

RRR चं धमाकेदार 'नाचो नाचो' गाणं रिलीज, रामचरण आणि Jr NTR चा डान्स पाहून तुम्हीही नाचाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 7:01 PM

Naacho Naacho Video Song : हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. कॅची बीट्स, डान्समध्ये एनर्जी पाहून कुणालाही या गाण्यावर डान्स करायची इच्छा होईल.

Naacho Naacho Video Song : बाहुबली सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आगामी 'आरआरआर' (RRR) सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. हा मल्टीस्टारर सिनेमा पुढील वर्षी ७ जानेवारीला रिलीज होणार आहे. आता या सिनेमाती 'नाचो नाचो' हे धमाकेदार गाणं रिलीज केलं आहे. लिरिकल म्युझिक व्हिडीओमध्ये रामचरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (NTR) आपला जबरदस्त डान्स दाखवत आहे.

हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. कॅची बीट्स, डान्समध्ये एनर्जी पाहून कुणालाही या गाण्यावर डान्स करायची इच्छा होईल. नाचो नाचो हे गाणं विशाल मिश्रा आणि राहुल सिप्लिगुंजने गायलं आहे. तर या गाण्याला Rakshith ने कोरिओग्राफ केलं आहे. राम चरण हे गाणं ट्विटरवर शेअर करत लिहिलं की, नाचो नाचो च्या मास बीट्सवर डान्स करण्यापासून राहवलं जात नाहीये. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांची यातील डान्सची जुगलबंदी बघण्यासारखी आहे. 

'RRR' सिनेमाची कथा १९२० साला दरम्यानची आहे. या स्वातंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी Seetharamaraju यांची कथा दाखवण्यात आली आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यात मुख्य भूमिकेत आहेत. राजामौली यांच्या सिनेमात आलिया भट्ट, अजय देवगण, ओलिविया मौरिस यांच्या मुख्य भूमिका असतील. 

बाहुबलीनंतर राजामौली यांचा हा कमबॅक सिनेमा आहे. या सिनेमाचं एकूण बजेट ४५० कोटी रूपये असल्याचं बोललं जात आहे. बाहुबलीने देश-विदेशात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्यामुळे आता लोकांना आरआरआरकडूनही अपेक्षा आहेत. आरआरआर वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. 

टॅग्स :राम चरण तेजाआलिया भटअजय देवगण