Join us  

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर अशाप्रकारे लक्ष ठेवायचे हेमा मालिनी यांचे वडील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 5:02 PM

हेमा मालिनी यांच्यावर लक्ष देण्यासाठी त्यांचे आई-वडील तर अनेकवेळा चित्रपटाच्या सेटवर देखील यायचे. हेमा मालिनी यांनी नुकतीच इंडियन आयडलच्या सेटवर हजेरी लावली होती. त्यांनीच याविषयी या कार्यक्रमात सांगितले. 

ठळक मुद्देहेमा मालिनी यांनी सांगितले, “एरव्ही माझी आई किंवा मावशी माझ्यासोबत सेट्सवर यायच्या. पण या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मात्र माझे वडील माझ्या सोबत आले होते, कारण धरमजी आणि माझ्यात मैत्री पेक्षा काही तरी जास्त असल्याचे त्यांना माहीत होते.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले असून त्यांना इशा आणि आहाना अशा दोन मुली आहेत. 1975 मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या अफेअरची चर्चा मीडियात रंगली आणि काहीच वर्षांत त्यांनी लग्न केले. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच हेमा मालिनी यांच्यासह लग्न केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे नाते त्यांच्या आई-वडिलांना अजिबातच पटत नव्हते. आपल्या मुलीने विवाहित व्यक्तीसोबत नात्यात असू नये असे त्यांना वाटत होते आणि त्यासाठी ते दोघेही हेमा मालिनी यांच्यावर लक्ष ठेवायचे.

हेमा मालिनी यांच्यावर लक्ष देण्यासाठी त्यांचे आई-वडील तर अनेकवेळा चित्रपटाच्या सेटवर देखील यायचे. हेमा मालिनी यांनी नुकतीच इंडियन आयडलच्या सेटवर हजेरी लावली होती. त्यांनीच याविषयी या कार्यक्रमात सांगितले. 

 इंडियन आयडलमधील सगळ्याच स्पर्धकांनी हेमा मालिनी यांच्यासमोर एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स दिले. ‘ए दिल-ए-नादां’ आणि ‘जूठे नैना बोले’ या गीतांवरील अंजलीचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहून सगळे परीक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले आणि त्यांनी तिचे खूप कौतुक केले. त्यानंतर हेमा मालिनी यांनी एक गंमतीदार किस्सा सांगितला. धमेंद्र आणि त्या नात्यात होत्या त्यावेळेचा हा किस्सा होता. ते एका गाण्याचे शूटिंग करत होते आणि त्या शूटसाठी त्यांचे वडील खास आले होते. जेणे करून या दोघांना एकांत मिळू नये.

 हेमा मालिनी यांनी सांगितले, “एरव्ही माझी आई किंवा मावशी माझ्यासोबत सेट्सवर यायच्या. पण या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मात्र माझे वडील माझ्या सोबत आले होते, कारण धरमजी आणि माझ्यात मैत्री पेक्षा काही तरी जास्त असल्याचे त्यांना माहीत होते. त्यामुळे आम्हा दोघांना एकमेकांसोबत घालवायला वेळ मिळू नये अशी त्यांची इच्छा होती. मला आठवते आहे, जेव्हा आम्ही कारमधून जायचो, तेव्हा माझे वडील झटकन येऊन माझ्या शेजारी बसायचे पण धरमजी देखील काही कमी नव्हते, ते त्या पुढच्या सीटवर बसून जायचे.”

टॅग्स :हेमा मालिनीधमेंद्र