Must watch : वैदेही परशुरामीच्या नाजुक-साजूक फोटोंचा खजिना...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST
मराठी इंडस्ट्रीतील नाजूक साजूक अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ‘वेड लावी जीवा’,‘वृंदावन’,‘कोकणस्थ’,‘फू’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारी वैदेही परशुरामी हिचे फोटो पाहताच आपण तिच्या प्रेमात पडलो नाही, तरच नवल! तिच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीला एक फ्रेश आणि क्यूट चेहरा मिळालाय. पाहूयात, मग तिच्या काही फोटोंचा हा खजिना...
Must watch : वैदेही परशुरामीच्या नाजुक-साजूक फोटोंचा खजिना...!
मराठी इंडस्ट्रीतील नाजूक साजूक अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ‘वेड लावी जीवा’,‘वृंदावन’,‘कोकणस्थ’,‘फू’ या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारी वैदेही परशुरामी हिचे फोटो पाहताच आपण तिच्या प्रेमात पडलो नाही, तरच नवल! तिच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीला एक फ्रेश आणि क्यूट चेहरा मिळालाय. पाहूयात, मग तिच्या काही फोटोंचा हा खजिना...वैदेही वैभव परशुरामी हिचा जन्म मुंबईतलाच. १ फेब्रुवारी १९९२ रोजी तिचा जन्म झाला असून तिचे वय २५ आहे. तिच्या या फोटोवरून ती किती तरूण आहे, हे जाणवते. तिचा क्यूट लूक पाहणाऱ्याला घायाळ करतो. तिने साहित्यात ‘बी.ए. इंग्रजी’ ची पदवी संपादन केली असून मुंबईच्या लॉ कॉलेजमधून तिने एलएलबी केले आहे. सध्या ती चर्चेत आहे ते ‘फू’ चित्रपटामुळे. आकाश ठोसर आणि संस्कृती बालगुडे यांच्यासोबत ती प्रमुख भूमिकांमध्ये दिसली. ‘वेड लावी जीवा’ या चित्रपटातून तिने मराठी इंडस्ट्रीत डेब्यू केला आहे. आदिनाथ कोठारे याच्यासोबतची केमिस्ट्री सर्व रसिक प्रेक्षकांना बेहद आवडली. तिने विधु विनोद चोप्रा यांच्या ‘वझीर’ चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. तिची छोटीशी पण महत्त्वाची भूमिका पे्रक्षकांना खुप आवडली. ‘लाडली’ या वुमेन्स एम्पॉवरमेंट उपक्रमाचा चेहरा ती होती. केवळ साध्या, सोज्वळच भूमिका तिने केल्या असे काही नाही, ती बऱ्याच चित्रपटांमध्ये ग्लॅमरस दिसत होती. २०१२ चा ‘मिस क्लिन अॅण्ड क्लिअर’ हा किताब तिने जिंकला. तसेच टीव्ही कमर्शियल्स, वेडिंग ज्वेलरी ब्रँड यामध्येही तिने काम केले आहे.