Join us  

प्रसिद्ध संगीतकार जोडी मीत ब्रदर्सवर कोसळला दुःखाचा डोंगर, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 11:58 AM

प्रसिद्ध गायक व संगीतकार जोडी मीत ब्रदर्स यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

प्रसिद्ध गायक व संगीतकार जोडी मीत ब्रदर्स यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील सरदार गुलजार सिंग चंदोक यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. गुलजार सिंग बऱ्याच कालावधीपासून आजारी होते. मागील वर्षी मीत ब्रदर्सचे दोन्ही भाऊ म्हणजेच मनमीत व हरमीत यांनी त्यांचे आई वडीलांच्या लग्नाचा ४५वा वाढदिवस पुनर्विवाहाने साजरा केला होता.

सरदार गुलजार सिंग यांच्यावर हिंदी सिनेइंडस्ट्रीतील लोक खूप प्रेम करतात. गुलजार सिंग यांना दुसऱ्यांना खाऊपिऊ घालायला खूप आवडते. त्यामुळे त्यांच्या घरी आलेले कोणताही व्यक्ती न खाता पिता परत जात नव्हते. काही वर्षांपूर्वी मध्यप्रदेश सोडून ते आपल्या मुलांकडे आले होते.

मीत ब्रदर्सच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार गुलजार सिंग यांनी बुधवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. पण तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. 

मीत ब्रदर्सने झी म्युझिकसोबत आपला पहिला अल्बम काढून गायक म्हणून मुंबईतून सुरूवात केली आहे. त्यापूर्वी मनमीत सिंग यांनी बालाजी टेलीफिल्म्समध्ये एकता कपूरसोबत काम केले आहे.

हरमीत व मनमीत यांना त्यांच्या वडिलांच्या संघर्षावर बायोपिक बनवण्याची इच्छा आहे. त्यासाठी गुलजार सिंग यांनी त्यांची कथा लिहायला देखील सुरूवात केली होती.

टॅग्स :एकता कपूर