Join us  

‘मुक्काबाज’ फेम विनीत कुमारने मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ, पाहा तर ती कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 10:14 AM

Vineet Kumar Singh Wedding : आपल्या लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करताना विनीतने भावुक करणारी नोटही लिहिली आहे.

‘मुक्काबाज’ फेम बॉलिवूड अभिनेता विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh ) त्याची गर्लफ्रेन्ड व मराठमोळी अभिनेत्री रूचिरा गोरमारेसोबत (Ruchiraa Gormaray) लग्नबंधनात अडकला. इन्स्टाग्रामवर विनीत व रूचिरा दोघांनीही लग्नाचे फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. 29 नोव्हेंबरला कपलने लग्नाच्या आणाभाका घेतल्या.लग्नाचे फोटो शेअर करत विनीतने रूचिरासाठी खास मॅसेजही लिहिला आहे. ‘तुझा हात धरून इथपर्यंत आलो. तू माझ्या आयुष्यात आहेस, यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानतो,’ असं त्यानं लिहिलं आहे. विनीतच्या या पोस्टनंतर सेलिब्रिटी व चाहत्यांनी नवविवाहित दांम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

विनीत व रूचिरा सुमारे 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र या रिलेशनशिपची भणक दोघांनी कुणाला लागू दिली नव्हती. दोघांनीही अगदी खासगी पद्धतीने लग्न केलं. केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र या लग्नाला उपस्थित होते. रूचिरा ही महाराष्ट्रीय असल्यामुळे महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही रितीरिवाजानुसार हा विवाह सोहळा पार पडला. विनीत व रूचिरा यांनी 2020 मध्यचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोव्हिडमुळे हा प्लान रद्द करावा लागला होता. 

विनीतने वयाच्या 21 व्या वर्षी ‘पिता’ या चित्रपटातून अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. यानंतर चेन खुली की मेन खुली, जन्नत, गँग्स ऑफ वासेपूर, इश्क, गोरी तेरे प्यार में अशा अनेक चित्रपटात तो झळकला. गँग्स आॅफ वासेपूरमधील त्याच्या अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं होतं. पण त्याला खरी ओळख ही ‘मुक्काबाज’ या सिनेमानं दिली. हा सिनेमा त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. ‘मुक्काबाज’नंतर गोल्ड, सांड की आंख, आधार व गुंजन सक्सेना अशा चित्रपटाही तो झळकला.रूचिराबद्दल सांगायचं तर ती महाराष्ट्रीयन आहे. ‘वाजवुया बँड बाजा’ या मराठी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर डेब्यू केला. त्याआधी इम्तियाज अलीच्या एका शॉर्ट फिल्ममध्येही ती झकळली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चूडियां’ या चित्रपटातही ती दिसली होती. चित्रपटात येण्याआधी रूचिराने ‘मुक्काबाज’ या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं.

टॅग्स :विनीत कुमार सिंह