‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 03:47 IST
टीम इंडियाचा कॅप्टन एमएस धोनी याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक ‘एम.एस.धोनी -द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. ...
‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ पोस्टर आऊट
टीम इंडियाचा कॅप्टन एमएस धोनी याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक ‘एम.एस.धोनी -द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. सुशांतसिंग राजपूत याने एम.एस. धोनीची भूमिका केली आहे. इंडियन क्रिकेट कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अभिनेत्री कायरा अडवाणी हिने धोनीची पत्नी साक्षी धोनी हिची भूमिका केली आहे.अनुपम खेर याने धोनीच्या वडिलांची पानसिंगची भूमिका केली आहे. तसेच हेरी टंगरी याने युवराज सिंगची भूमिका केली आहे. भूमिका चावला आणि दिशा पाटणी या दोघीही चित्रपटाचा भाग असणार आहे. हा चित्रपट २ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. नीरज पांडे यांनी अगोदर ‘स्पेशल २६’, ‘बेबी’,‘ अ वेडन्सडे ’ चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. }}}}