‘एम.एस. धोनी-दी अनटोल्ड स्टोरी’ टीझर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 11:55 IST
नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम.एस. धोनी-दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचे टिझर आज मंगळवारी आऊट झाले. टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या भारत विरूद्ध ...
‘एम.एस. धोनी-दी अनटोल्ड स्टोरी’ टीझर आऊट
नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम.एस. धोनी-दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचे टिझर आज मंगळवारी आऊट झाले. टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या भारत विरूद्ध न्युझीलंड सामन्याचा थरार नागपुरात सुरु असतानाच, हा टीझर जारी करण्यात आला. भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान एम.एस. धोनी याच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात सुशांतसिंह राजपूत धोनीची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री कायरा अडवाणी हिने धोनीची पत्नी साक्षी हिची भूमिका वठलली आहे.