Join us

माझ्या जीवनावरील चित्रपट फ्लॉप होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:06 IST

            मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपला ७३ वा वाढदिवस साजरा केला. माझ्या जीवनावर कोणताही चित्रपट ...

            मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपला ७३ वा वाढदिवस साजरा केला. माझ्या जीवनावर कोणताही चित्रपट काढू नये, तो अयशस्वी होईल, असे बच्चन यांनी म्हटले आहे. बॉलिवूडच्या यशस्वी कलाकारांच्या जीवनावर चित्रपट काढले जातात. 'माझ्या जीवनावर चित्रपट निघेल असे मला वाटत नाही. मी त्या पठडीतला नाही. मी त्यासाठी योग्य असल्याचे मला वाटत नाही. तो नक्कीच अयशस्वी होईल. माझे वडील लेखक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांच्या जीवनावर कोणी चित्रपट काढला तर आपली हरकत नसल्याचे बच्चन म्हणाले. त्यांच्यावर कोणी डॉक्युमेंटरी काढणार असल्यास ते ठीक आहे, परंतु मी वैयक्तिकरित्या तसे करणार नसल्याचेही ते म्हणाले.