Join us

move your lakk : पाहा, ‘नूर’मधील सोनाक्षी, दिलजीत व बादशाहचा धम्माल डान्सिंग नंबर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 11:18 IST

सोनाक्षी सिन्हा हिचा ‘नूर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे ‘मूव यॉर लक़..’ हे गाणे रिलीज झाले . हे गाणे यंदाचे सगळ्यात लोकप्रीय पार्टी साँग झाले तर, तुम्हाला आश्चर्य वाटायला नको.

सोनाक्षी सिन्हा हिचा ‘नूर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे ‘मूव यॉर लक़..’ हे गाणे रिलीज झाले. हे गाणे यंदाचे सगळ्यात लोकप्रीय पार्टी साँग झाले तर, तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. कारण सोनाक्षी सिन्हा, दिलजीत दोसांज व रॅपर बादशाह या तिघांचा अनोखा अंदाज पाहून तुम्ही या गाण्यावर ठेका धरण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाही. ‘मूव यॉर लक़..’ हे एक पंजाबी डान्सिंग नंबर आहे. सोनाक्षीने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. सगळ्यात विशेष म्हणजे, हे गाणे अतिशय मजेशीर अंदाजात चित्रीत करण्यात आले आहे. घरात झोपेतून उठलेली सोनाक्षी अचानक डिस्को स्टाईलमध्ये दिसायला लागते. मग या गाण्यात दिलजीत व बादशाह यांची धमाकेदार एन्ट्री होते. सोनाक्षीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे गाणे शेअर केले आहे. ‘यह समय है नूर के साथ अपनी कमर मटकाने का’ असे तिने लिहिले आहे.अलीकडे एका मुलाखतीत सोनाक्षीने या गाण्याबद्दलची एक्साईटमेंट बोलून दाखवली होती. बादशाह व मी गेल्या वर्षभरापासून सोबत काम करण्यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर ‘नूर’च्या निमित्ताने आम्हाला ही संधी मिळाली. हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी खास आहे. बादशाहसोबतच दिलजीतही माझ्यासोबत आहे, याचाही आनंद आहे. दिलजीत व बादशहा हे दोघेही दिग्गज गायक आहेत. त्यांच्यासोबत काम करून वेगळाच आनंद झाला, असे सोनाक्षी म्हणाली होती.ALSO READ : Noor song Gulabi 2.0 out: ​पाहा; सोनाक्षी सिन्हाचा ‘गुलाबी’ अंदाज!!सुनील सिप्पी दिग्दर्शित ‘नूर’मध्ये सोनाक्षी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. पाकिस्तानातील बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोहोचणे आणि तिथल्या बातम्या देण्याचे काम सोना या चित्रपटात करणार आहे. या प्रवासात सोनाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. अलीकडे सोनाक्षी ‘फोर्स2’आणि ‘अकिरा’ या चित्रपटात दिसली. यात सोनाक्षीचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळाला होता.