Join us  

स्टाईल नव्हे जुगाड! म्हणून अमिताभ बच्चन यांनी हात खिशात घालून केले होते ‘शराबी’चे शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 6:13 PM

अख्ख्या सिनेमात अमिताभ यांचा डावा हात त्यांच्या पँटच्या खिशात आहे. प्रेक्षकांना, चाहत्यांना ही अमिताभ यांची स्टाईल वाटली. पण...

ठळक मुद्देअमिताभ बच्चन आणि जयाप्रदा यांच्या भूमिका असणारा ‘शराबी’ हा चित्रपट हॉलीवूड मधील ‘ ऑर्थर ’ या चित्रपटावर आधारित आहे.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेले बिग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सिनेमाचे किस्से इतके की, संपता संपणार नाहीत. ‘शराबी’ (Sharaabi) या सिनेमाचा हा किस्सा कदाचितच तुम्ही वाचला नसावा. या सिनेमातील एक गोष्ट तुम्ही कदाचित नोट केली असेल. ती म्हणजे, अख्ख्या सिनेमात अमिताभ यांचा डावा हात त्यांच्या पँटच्या खिशात आहे. प्रेक्षकांना, चाहत्यांना ही अमिताभ यांची स्टाईल वाटली. पण त्यामागे कारण होते एक अपघात. (Amitabh Bachchan film Sharaabi )होय, स्वत: अमिताभ यांनी यामागचा किस्सा सांगितला होता.

‘शराबी’ अमिताभ बच्चन यांनी स्टाईल म्हणून आपला डावा हात खिशात ठेवला नव्हता. तर कारण वेगळ होते.  दिवाळीमध्ये फटाके उडवत असताना अमिताभ डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यांचा हात पूर्णपणे भाजून निघाला होता. इतका की की तो ‘तंदूरी चिकन’ सारखा भासत होता. हाताला दुखापत झाली असूनही अमिताभ यांनी ‘शराबी’चे शूटींग पूर्ण केले होते. पण हा भाजलेला हात पडद्यावर कसा दाखवणार? अशावेळी ‘शराबी’चे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी एक शक्कल लढवली आणि ती कामी आली.

‘सिनेमात तू एका बिघडलेल्या दारूड्या मुलाची मुलाची भूमिका साकारणार आहेस. त्यामुळे तुझा हात तू खिशात घाल,’ असे प्रकाश मेहरा यांनी अमिताभ यांना सुचवले आणि अमिताभ यांनी तेच केले. हात लपला आणि हा जाणीवपूर्वक खिशात लपवलेला हातच अमिताभ यांची स्टाईल बनला.  चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर लोकांना ही स्टाईल इतकी आवडली की, लोक या स्टाईलच्या प्रेमात पडले.अमिताभ बच्चन आणि जयाप्रदा यांच्या भूमिका असणारा ‘शराबी’ हा चित्रपट हॉलीवूड मधील ‘ ऑर्थर ’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘शराबी’ तुफान गाजला़ इतका की, याचा ‘थंडा कनिके’ नावाने तमिळ रिमेकसुद्धा तयार करण्यात आला होता.   अमिताभ सोबत या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार सुद्धा होते. जया प्रदा, प्राण,ओम प्रकाश यांनी या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

टॅग्स :अमिताभ बच्चन