Join us  

सुभाष घईंच्या पार्टीत असं काय घडलं? मोनिका बेदीच्या हातातून गेला 'करण अर्जुन' सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 12:12 PM

ममता कुलकर्णीच्या जागी दिसली असती मोनिका बेदी. सुभाष घईंच्या पार्टीत घडलेला किस्सा माहितीये का

सलमान खान आणि शाहरुख खानचा सुपरहिट सिनेमा 'करण अर्जुन' (Karan Arjun) आजही सिनेप्रेमींच्या लक्षात आहे. 'मेरे करण अर्जुन आएंगे' हा डायलॉग तर आयकॉनिकच ठरला. या ब्लॉकबस्टर सिनेमात स्टारकास्टही तेवढीच तगडी होती. शाहरुख खान, सलमान खानसह काजोल आणि ममता कुलकर्णी मुख्य भूमिकेत होत्या. तसंच अभिनेत्री राखी यांनी शाहरुख सलमानच्या आईची भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहितीये सिनेमात ममता कुलकर्णीच्या जागी मोनिका बेदी (Monica Bedi) असणार होती. एका चुकीमुळे मोनिका बेदीच्या हातातून तो रोल गेला.

मोनिका बेदीने नुकतेच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले,'मी सुभाष घई यांच्या होळी पार्टीत गेले होते. माझ्यासोबत माझी मित्रमंडळीही होती. तिथे माझी भेट राकेश रोशन यांच्यासोबत झाली. बराच वेळ गप्पा झाल्यानंतर त्यांनी मला कार्ड दिलं आणि नंतर फोन करायला सांगितलं. मला कळलंच नाही की त्यांनी मला का कार्ड दिलं असावं. कारण मला वाटलं की राकेशजी फक्त अभिनेते आहेत. ते फिल्ममेकर आहेत असं मला वाटलंही नव्हतं. मी ते कार्ड घेतलं आणि नंतर फेकून दिलं.'

ती पुढे म्हणाली, 'काही महिन्यांनी मला मॅनेजरने विचारलं की मी राकेशजींना का नाही भेटले. ते म्हणाले, राकेशजींना मला सलमान आणि शाहरुखच्या सिनेमात काम करायला घ्यायचं होतं. मला ते ऐकताच धक्का बसला. तेव्हा मला काहीच कळायचं नाही. मी फक्त सिनेमा पाहायचे आणि अभिनेता अभिनेत्री माहित असायचे. पण दिग्दर्शक कोण, निर्माते कोण याबद्दल मला माहितीच नसायची.'

नंतर ती भूमिका ममता कुलकर्णीला ऑफर झाली. भूमिका हातातून जाण्याचा मला पश्चात्ताप नाही. कारण आपण जन्मत:च हुशार नसतो, असंही ती म्हणाली. 1995 साली आलेल्या 'सुरक्षा' सिनेमातून मोनिकाने डेब्यू केले होते. ती 'बिग बॉस 2' आणि 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्येही दिसली.  मोनिका गँगस्टर अबू सालेमसोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत आली होती. यानंतर तिला ऑफर मिळणं कमी झालं. आता

टॅग्स :ममता कुलकर्णीसलमान खानशाहरुख खानबॉलिवूड