Join us

​मोहनीश बहलची खंत; इंडस्ट्री मला दूर करते आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 21:07 IST

मागील ३० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपले स्थान कायम राखणारा मोहनीश बहल मागील दोन वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. यामागील कारण ...

मागील ३० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपले स्थान कायम राखणारा मोहनीश बहल मागील दोन वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. यामागील कारण सांगताना त्याने बॉलिवूडबद्दल आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. मोहनीश बहल म्हणाला,  मला कुणी चांगले काम देत नाही, मला या उद्योगापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोहनीश बहल २०१४ साली सलमान खानच्या ‘जय हो’ याचित्रपटात दिसला होता. मागील दोन वर्षांपासून तो एकाही चित्रपटात झळकला नाही. बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नूतनचा मुलगा असलेला मोहनीश बहल याने बॉलिवूडमध्ये तीस वर्षांत मैने प्यार किया, हम आपके है कौन, बागी, राजा हिंदुस्थानी, हम साथ साथ है, कहो ना प्यार है, अस्तित्व, फोर्स या सारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. कधी काळी सूरज बडजात्याच्या चित्रपटात हमखास झळकणारा मोहनीश आता मोठ्या पड्यावरून दिसेनासा झाला आहे. टीव्हीवरही त्याची उपस्थिती आता पूर्वी ऐवढी उल्लेखनीय राहीलेली नाही. चित्रपटात भूमिका न मिळण्याचे कारण त्याचे वय आहे का? असा प्रश्न विचारल्यावर ५५ वर्षांचा हा कलावंत म्हणाला, मला वाटत नाही की, यामागे वय हे कारण असावे. मला वाटते की प्रत्येक अभिनेत्याच्या जीवनात चढ-उतार येतच असतात. मी स्वत:बद्दल हे सांगू शकत नाही की चित्रपटसृष्टी मला काम देऊ शकत नाही, मात्र मला असे जरूर म्हणावे लागेल क ी, चित्रपटांची संख्या जलद गतीने कमी होत आहे. माझ्या जवळ खरा आकडा नाही. मात्र जर चित्रपट निर्माण झाले तर प्रत्येक कलाकाराकडे कोणते तरी काम असतेच. मला कुणीच चांगले काम देत नाही, मला या इंडस्ट्रीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोहनीश बहल सध्या ‘होशियार... सही वक्त सही कदम’ या मालिके चे संचालन करीत आहे. मोहनीश म्हणाला, मला चित्रपटात नव्हे तर मालिकांत बºयापैकी काम मिळत आहे. माझी एक समस्या देखील आहे, की स्क्रिप्ट चांगली नसेल तर मी ती आॅफर नाकारतो. मोहनीश आपल्या करिअरचे श्रेय राजश्री प्रोडक्शनला देत असल्याचा उल्लेखही त्याने केला.