Join us  

हे आहे कतरिना कैफ आणि मोहम्मद कैफमध्ये नाते, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 2:57 PM

कतरिनाचे आडनाव आणि भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफचे आडनाव सारखे असल्याने त्यांच्यात काही नाते आहे का ही चर्चा नेहमीच आपल्याला ऐकायला मिळते.

ठळक मुद्देमोहम्मद कैफने ट्वीटरवर नुकताच त्याचा आणि कतरिनाचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोसोबत एक मजेशीर पोस्ट लिहिली आहे. त्याने फोटोसोबत लिहिले आहे की, शेवटी कैफ भेटले. पण आमच्यात अद्याप तरी माणुसकीशिवाय कोणतेही नाते नाहीये.

कतरिना कैफचा भारत हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांनी खूप चांगला अभिनय केला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तसेच या चित्रपटातील सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. सलमानच्या या चित्रपटाला खूप चांगले ओपनिंग मिळाले असून त्याबाबत त्याने आपल्या फॅन्सचे ट्वीटरद्वारे आभार देखील मानले आहेत.

 

भारत या चित्रपटाचे सलमान आणि कतरिना यांनी जोरदार प्रमोशन केले होते. त्यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर या चित्रपटाच्या संबंधित अनेक पोस्ट केले होते. त्याचसोबत त्यांनी अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये देखील हजेरी लावली होती. याच प्रमोशनच्या दरम्यान सलमान आणि कतरिना मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण या माजी भारतीय क्रिकेटपट्टूंना भेटले होते. सलमान खानने या भेटीचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता. 

 

कतरिनाचे आडनाव आणि भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफचे आडनाव सारखे असल्याने त्यांच्यात काही नाते आहे का ही चर्चा नेहमीच आपल्याला ऐकायला मिळते. पण आता या चर्चेवर पूर्णविराम लागला असून त्या दोघांमध्ये काय नाते आहे हे मोहम्मदने सांगितले आहे. 

 

मोहम्मद कैफने ट्वीटरवर नुकताच त्याचा आणि कतरिनाचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोसोबत एक मजेशीर पोस्ट लिहिली आहे. त्याने फोटोसोबत लिहिले आहे की, शेवटी कैफ भेटले. पण आमच्यात अद्याप तरी माणुसकीशिवाय कोणतेही नाते नाहीये. या त्याच्या पोस्टवर सोशल मीडियावर त्याची चांगलीच फिरकी घेण्यात आली आहे. काही नेटिझन्सने म्हटले आहे की, अद्याप तरी असे म्हणत मोहम्मद कतरिनासोबत फ्लर्ट करत आहे... तर दुसऱ्याने तुमच्यात कोणतेही नाते नाहीये असे तू कसे म्हणू शकतोस... आपण सगळे भारतीय एकमेकांचे बांधव आहोत हे विसरलास का... असे विविध कमेंट करत नेटिझन्स मोहम्मदची टर उडवत आहेत. 

 

भारत या चित्रपटात सलमान आणि कतरिनासोबतच जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :कतरिना कैफभारत सिनेमासलमान खान