Join us  

मोबाइलपासून गाड्यांपर्यंत एकच नंबर, सुशांतच्या लकी नंबरच्या गाड्यांचा होणार लिलाव?  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 10:38 AM

सुशांतकडे तीन गाड्या होत्या आणि या गाड्या घेण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर आता त्याच्या गाड्यांचा लिलाव होणार असल्याचे बोलले जात आहे. सुशांतच्या गाड्या विकत घेण्यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत. सुशांतने तीन गाड्या घेतल्या होत्या. या गाड्यांची बाजार भावाने किंमत सध्या दीड कोटी रुपये आहे. ही गाड्यांची रिसेल किंमत आहे. 

सुशांतच्या सर्व गाड्यांचे नंबर हे 4747 असे आहेत. हा नंबर सुशांतचा लकी नंबर असल्याचे त्याचे जवळचे सांगतात. 2014 पासून सुशांत 4747 हा नंबर निवडत होता. मोबाईल, गाडी आणि वैयक्तिक पातळीवरही तो हाच नंबर वापरत होता.

सुशांतच्या मृत्यूनंतर आता त्याचे कुटुंबीय या गाड्यांचा लवकरच लिलाव करण्याची शक्यता आहे. या गाड्या घेण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत. सुशांत यांच्या जवळच्या लोकांशी संपर्क करत आहेत.

सुशांत सिंग राजपूत याने 14 जून रोजी वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला.

मात्र, सुशांतच्या मृत्यूचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. त्यामुळे पोलीस याबाबत तपास करत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत