Join us  

मिथुन चक्रवर्ती यांच्या वडिलांचे मुंबईत निधन, बेंगळुरुमध्ये अडकून पडलेत मिथुनदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 3:27 PM

मिथुन एका चित्रीकरणासाठी बेंगळुरूला गेले होते. लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकून पडले.

ठळक मुद्दे मिथुन एका चित्रीकरणासाठी बेंगळुरूला गेले होते. लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकून पडले.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचे वडील बसंतकुमार चक्रवर्ती यांचे दीर्घआजाराने निधन झाल्याचे कळतेय. ते 95 वर्षांचे होते. मंगळवारी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुत्रपिंडविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला.अद्याप मिथुन यांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र टाईम्स ऑफ  इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.बंगाली अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता यांनीही एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रितुपर्णा सेनगुप्ता यांनी मिथुन दांच्या वडिलांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले असून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान तूर्तास मिथुन चक्रवर्ती बेंगळुरूमध्ये अडकून पडले आहेत. प्राप्त माहितीनुसार, पित्याच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर मुंबईत येण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मिथुन एका चित्रीकरणासाठी बेंगळुरूला गेले होते. लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकून पडले.बसंत कुमार हे कलकत्ता टेलिफोन्समध्ये नोकरीला होते. त्यांना एक मुलगा व तीन मुली अशी चार अपत्ये आहेत. यात मिथुन चक्रवर्ती सर्वांत थोरले आहेत.

टॅग्स :मिथुन चक्रवर्ती