Join us  

मिथुन चक्रवर्ती उपचारासाठी अमेरिकेला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 10:18 AM

मिथुन चक्रवर्ती यांना पाठदुखीचा त्रास गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. 2009 मध्ये लकी या चित्रपटातील एका अॅक्शन दृश्याचे चित्रीकरण करताना त्यांना दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना पाठदुखीचा त्रास होत आहे.

ठळक मुद्देमिथुन यांना गेल्या काही दिवसांपासून पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी अमेरिकेत जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिथुन चक्रवर्ती यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना अमेरिकेतील लॉस एन्जलिस येथील रुग्णायलात दाखल करण्यात आले आहे. त्यांना गेल्या काही दिवसांपासून पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी अमेरिकेत जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमेरिकेत त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती आणि सून मदालासा शर्मा देखील आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांना पाठदुखीचा त्रास गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. 2009 मध्ये लकी या चित्रपटातील एका अॅक्शन दृश्याचे चित्रीकरण करताना त्यांना दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना पाठदुखीचा त्रास होत आहे. पाठदुखीने असह्य झाल्याने त्यांनी त्यावर अमेरिकेत जाऊन उपचार घेतले होते. त्यावेळी त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली होता. पण 2016 मध्ये त्यांना पुन्हा पाठदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांनी अभिनयातून काही महिन्यांचा ब्रेक घेत पुन्हा एकदा यावर उपचार घेतले होते. तरीही आजही ते पाठदुखीने त्रस्त आहेत. त्यामुळे आता त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिथुन यांना लहानपणापासून डान्सची आवड होती आणि शहरात वेगवेगळ्या ठिकाणी डान्स करून ते पैसे मिळवत असे. डान्ससोबत त्यांना अभिनयाचीही आवड होती. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. सुरुवातीला मिथुन यांनी ज्युनिअर कलाकार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना 'मृगया' या सिनेमात मोठी संधी मिळाली. या सिनेमातील त्यांच्या कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. पण त्यानंतरही त्यांचा स्ट्रगल सुरूच होता. त्यांना सिनेमे मिळायला बराच वेळ लागला. 1982 मध्ये मिथुन यांच्या 'डिस्को डान्सर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आणि तेव्हापासून इंडस्ट्रीला एक डिस्को डान्सर मिळाला. खऱ्या अर्थाने या सिनेमामुळे मिथुन यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने केवळ हिंदीच नाही तर बंगाली आणि उडिया भाषेतही सिनेमे केले.

सिनेमांसोबतच मिथुन हे हॉटेल बिझनेसमध्येही आहे. उटी आणि मसूरीमध्ये त्यांचे काही हॉटेल्स आहेत. 

टॅग्स :मिथुन चक्रवर्ती