Join us

मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांच्या बायोपिकचे पोस्टर रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 21:06 IST

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक निर्मितीचा यशस्वी ट्रेण्ड सुरू आहे. वर्षाला किमान अर्धा डझन तरी बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याने अनेक ...

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक निर्मितीचा यशस्वी ट्रेण्ड सुरू आहे. वर्षाला किमान अर्धा डझन तरी बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याने अनेक व्यक्तिमत्त्वांचा प्रेक्षकांना उलगडा होत आहे. आता मिसाइल मॅन अन् भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावरही बायोपिक निर्मिती केली जात असून, त्याबाबतचे एक पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आयुष्य देशातील प्रत्येक नागरिकांसाठी विशेषत: तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपले संघर्षपूर्ण आयुष्य अखेरच्या क्षणापर्यंत देशासाठी अर्पण केले. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी केलेले काम अन् घालून दिलेले आदर्श पिढ्यानपिढ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे दिशादर्शकांचे काम करणार आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाची बॉलिवूडकरांना मोहिनी पडणार नसेल तरच नवल. दरम्यान, त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. डॉ. कलाम यांच्या बायोपिकचे पोस्टर इस्त्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी लॉन्च केले. या बायोपिकची निर्मिती तेलगू निर्माता अनिल सुंकारा आणि अभिषेक अग्रवाल करीत आहेत. यासाठी अनिल सुंकारा यांनी राज चेंगप्पा यांनी दिवंगत डॉ. कलाम यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचे राइट्सही खरेदी केले आहेत. अशी अपेक्षा केली जात आहे की, बायोपिकमध्ये डॉ. कलाम यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील काही गोष्टी दाखविल्या जातील.डॉ. अब्दुल पाकीर जैनुल आबेदीन अर्थात डॉ. अब्दुल कलाम हे व्यक्तिमत्त्व तरुणांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी असल्याने या बायोपिकमधून तरुणांना त्यांच्याविषयी बºयाचशा गोष्टी जाणून घेता येतील. या बायोपिकच्या रिलीजबाबत अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आली नसली तरी शूटिंग पूर्णत्वास असल्याची माहिती समोर येत आहे.