Join us  

प्लीज, मला मजेदार सिनेमा द्या! पत्नी मीरा नाराज, शाहिद कपूरने सोशल मीडियावर मागितले काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 11:45 AM

शाहिद कपूर व मीरा राजपूत बॉलिवूडचे एक क्यूट कपल आहे. पण आता म्हणे, मीरा शाहिदवर काहीशी नाराज आहे.

ठळक मुद्देशाहिद कपूर जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची पत्नी मीरा राजपूतही लोकप्रिय आहे. म्हणायला, मीराचा फिल्मी दुनियेशी काहीही संबंध नाही. पण तरीही तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे.

शाहिद कपूरमीरा राजपूत बॉलिवूडचे एक क्यूट कपल आहे. पण आता म्हणे, मीरा शाहिदवर काहीशी नाराज आहे. होय, शाहिदने सिनेमात डान्स करावा, मजेदार चित्रपट करावेत, अशी तिची इच्छा आहे.  कदाचित ती शाहिदला एका वेगळ्या जॉनरच्या सिनेमात पाहू इच्छिते. आम्ही हे कशावरून म्हणतोय, तर शाहिदने शेअर केलेल्या एका पोस्टवरून.

होय, रविवारी शाहिदने इन्स्टावर एक मजेदार मॅसेज शेअर केला.  ‘माझी पत्नी माझ्यावर नाराज आहे. तिने मला चांगलेच सुनावले. कारण तिच्यामते, मी मजेदार चित्रपट करत नाहीये. ज्यात मी डान्स करू शकेन असे सिनेमे मी करावेत अशी तिची इच्छा आहे. हे एक ओपन इन्व्हिटेशन आहे. मला असे काही द्या, जेणेकरून मी तिला खूश करू शकेन. टाईपकास्ट हिरोची गरज आहे. मीरा राजपूत बघ, मी प्रयत्न तर करतोय,’ असे शाहिदने या पोस्टमध्ये लिहिले. या पोस्टसोबत त्याने स्वत:चे अ‍ॅनिमेटेड व्हर्जनही शेअर केले आहे.

एकंदर काय तर मीराची नाराजी दूर करण्यासाठी शाहिद कामाला लागला आहे. तेव्हा मीराला जसा हवा तसा सिनेमा शाहिदला मिळावा, अशी आशा करूयात.    ‘कबीर सिंग’ हा शाहिदचा अलीकडे आलेल सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. या सिनेमानंतर शाहिदने केवळ एक सिनेमा साईन केलाय. या सिनेमाचे नाव आहे, ‘जर्सी’. या सिनेमाचे शूटींग पूर्ण झालेय. पण हा सुद्धा एका तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. यात शाहिदसोबत मृणाल ठाकूर व पंकज त्रिपाठी लीड रोलमध्ये आहेत.

शाहिद कपूर जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची पत्नी मीरा राजपूतही लोकप्रिय आहे. म्हणायला, मीराचा फिल्मी दुनियेशी काहीही संबंध नाही. पण तरीही तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे. मीरा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.  2015 साली शाहिद आणि मीराने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच शाहिदच्या घरी मीशा नावाचे कन्यारत्न जन्मास आले. यानंतर 2018 मध्ये शाहिदला पुत्ररत्न प्राप्त झाले.

मीरा राजपूत व शाहिद कपूर तिसऱ्यांदा बनणार आई-बाबा? पत्नीने केला खुलासा

टॅग्स :शाहिद कपूरमीरा राजपूत