Join us  

रणबीर कपूरच्या ‘या’ हिरोईन मिळेनात भूमिका, करावे लागतेय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 12:54 PM

बॉलिवूडमध्ये स्टार बनणे प्रत्येकाच्या नशीबात नसते. अनेकजण स्टार बनण्याच्या इराद्याने बॉलिवूडमध्ये येतात. एक दोन सिनेमात झळकणार आणि अचानक गायब होतात. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचे नाव समाविष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमिनिषाने 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 2017 मध्ये प्रदर्शित ‘भूमी’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता.

बॉलिवूडमध्ये स्टार बनणे प्रत्येकाच्या नशीबात नसते. अनेकजण स्टार बनण्याच्या इराद्याने बॉलिवूडमध्ये येतात. एक दोन सिनेमात झळकणार आणि अचानक गायब होतात. अलीकडे अभिनेत्री मयुरी कांगोबद्दल अशीच एब बातमी आली होती. मयुरीचा पहिलाच चित्रपट हिट झाला. पण यानंतर अचानक ती बॉलिवूडमधून गायब झाली. सध्या ती गुगल इंडियामध्ये काम करतेय. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचे नाव समाविष्ट झाले आहे. ही अभिनेत्री म्हणे मिनिषा लांबा.

रणबीर कपूर सारख्या सुपरस्टारसोबत ‘बचना ऐ हसीनो’ या चित्रपटात मिनिषा दिसली. यानंतर हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, वेल डन अब्बा, भेजा फ्राई आणि जिला गाझियाबाद या सिनेमांत ती झळकली. पण यानंतर तिच्या करिअरला ओहोटी लागली आणि मिनिषाला वेगळे क्षेत्र निवडणे भाग पडले. आता ती एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. खुद्द तिनेच एका ताज्या मुलाखतीत ही माहिती दिली.

  बॉलिवूडमधील माझ्या करिअरने मला मागे पाडले. मला उत्तम भूमिका हव्या होत्यात. पण मनासारख्या भूमिका मिळत नव्हत्या. अशात एका मित्राने मला पोकर या खेळाबद्दल सांगितले. सुरुवातीला मी या खेळाकडे फार लक्ष दिले नाही. पण काही दिवसांनंतर मी तो खेळला आणि हळूहळू या खेळात पारंगत होत गेले. आता मी एक प्रोफेशनल पोकर खेळाडू आहे. अर्थात यादरम्यान मला काही मनासारख्या भूमिका मिळाल्याच तर मी त्या जरूर करेल. सध्या मला वेब सीरिज आणि टेलिव्हिजनच्या आॅफर्स येत आहेत, असे तिने सांगितले.

मिनिषाने अलीकडे पोकरच्या वर्ल्ड सीरिजमध्ये भाग घेतला होता. या खेळात तिला 1130 खेळाडूंमध्ये 64 वे स्थान मिळाले. पोकर खेळतानाचे अनेक फोटो मिनिषाने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.

मिनिषाने 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 2017 मध्ये प्रदर्शित ‘भूमी’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटात मिनिषा एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले.

टॅग्स :मिनिषा लांबारणबीर कपूर