Join us  

मिलिंद सोमणने शेअर केला मॉडेलिंग करिअरचा पहिला फोटो, 1 तासाच्या शूटसाठी मिळाले होते इतके पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 12:43 PM

होय, मिलिंदने त्याच्या पहिल्या मॉडेलिंग असाइनमेंटचे दोन फोटो शेअर केले आहेत, सोबत या फोटोंबद्दलचा किस्साही.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्तरावर स्विमिंग चॅम्पियनशिप जिंकणा-या मिलिंदने ‘आर्यन मॅन;चा किताबही जिंकला आहे. पण हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मिलिंद आपल्या उभ्या आयुष्यात कधीही जिममध्ये गेलेला नाही.

बॉलिवूडचा फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणने आपल्या करिअरमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. आज मिलिंद अनेकांचा रोल मॉडेल आहे. वयाच्या 55 व्या वर्षीही मिलिंदने ज्याप्रकारे स्वत:ला मेंटेन ठेवले आहे, ते पाहून अनेकजण थक्क होतात. तेवढीच त्याच्या कॉन्ट्रोव्हर्सीचीही चर्चा होते. पण ही बातमी आहे, ती मिलिंदच्या पहिल्या मॉडेलिंग असाइनमेंटची. होय, मिलिंदने त्याच्या पहिल्या मॉडेलिंग असाइनमेंटचे दोन फोटो शेअर केले आहेत, सोबत या फोटोंबद्दलचा किस्साही.

मिलिंद हे फोटो शेअर करताना लिहितो, ‘1989 सालची माझी पहिली अ‍ॅडव्हरटाइजिंग कॅम्पेन. मॉडेलिंग एक प्रोफेशन आहे, हे मला या कॅम्पेनआधी माहित नव्हते. अचानक एक सरप्राईज कॉल आला. त्या व्यक्तिने मला कुठेतरी पाहिले होते. मी त्यांच्यासाठी एक फोटोशूट करावे, अशी त्यांची इच्छा होती. मी त्यावेळी खूप लाजराबुजरा होतो. आधी तर मी नकारघंटा वाजवली. पण जेव्हा यासाठी मला 50 हजार रूपये आॅफर झालेत, ते सुद्धा तासाभरासाठी, तेव्हा मला होकार द्यावा लागला. Rasna Behl  ला यासाठी धन्यवाद...’ हे फोटोशूट केले तेव्हा मिलिंद 23 वर्षांचा होता आणि एका हॉटेलमध्ये काम करत होता. खरे तर त्याला हॉटेल इंडस्ट्रीत करिअर करायचे होते. पण एका होकाराने त्याचे अख्खे आयुष्य बदलले.

या पहिल्या मॉडेलिंग कॅम्पेननंतर मिलिंदने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याकाळचा सुपर मॉडेल म्हणून तो ओळखला जाऊ लागला. मॉडेलिंगमध्ये खूप नाव कमावल्यानंतर मिलिंद अभिनयाच्या क्षेत्रात आला. काही मालिकांमध्ये त्याने काम केले आणि नंतर बॉलिवूडचे अनेक सिनेमे.

राष्ट्रीय स्तरावर स्विमिंग चॅम्पियनशिप जिंकणा-या मिलिंदने ‘आर्यन मॅन;चा किताबही जिंकला आहे. पण हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मिलिंद आपल्या उभ्या आयुष्यात कधीही जिममध्ये गेलेला नाही. खुद्द मिलिंदने एका मुलाखतीत हे सांगितले होते. मी कधीही जिममध्ये जात नाही. फिट राहण्यासाठी मी धावतो. कधीही वेळ मिळो मी नुसता धावत सुटतो. पहाटे 5 च्या ठोक्याला मी रनिंगसाठी घरातून बाहेर पडलेला असतो. रात्री 10.30 वाजता झोपणे आणि पहाटे 4.30 ला उठणे हा माझा दिनक्रम आहे. रनिंगशिवाय मी स्विमींग आणि व्यायामाचे कुठेलही यंत्र न वापरता साधा व्यायाम करतो, असे तो म्हणाला होता.

‘न्यूड रन’च्या त्या फोटोवर पहिल्यांदा बोलला मिलिंद सोमण, म्हणाला....

Paurashpur Teaser : मिलिंद सोमण व अन्नू कपूर यांचा हा अवतार कधीही पाहिला नसेल!

टॅग्स :मिलिंद सोमण