Join us  

वयाने २६ वर्षे लहान असणाऱ्या अंकिता कोंवरसोबत मिलिंद सोमणला करायचे नव्हते लग्न, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 11:08 AM

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ससोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो.

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ससोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवरच्या वयात २६ वर्षांचा फरक आहे. तरीदेखील ते दोघे बॉलिवूडमधील हिट कपलपैकी एक आहेत. दरम्यान मिलिंद सोमण त्याने त्याच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. 

मिलिंद सोमणने नुकतेच टाइम्स नाउला सांगितले की, अंकितासोबतच्या पहिल्या भेटीतच त्याचे तिच्यावर प्रेम जडले होते. तो म्हणाला की, जेव्हा आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्ही म्हटले होते की आम्हाला लग्नात काहीच इंटरेस्ट नाही आणि हे बकवास आहे. माझे विवाहित जीवन अप्रतिम आहे. मी आनंदी आहे की माझे लग्न झाले. पण मला लग्न करायचे नव्हते.

त्याने पुढे सांगितले की, पहिल्यांदा आम्ही जेव्हा सात वर्षांपूर्वी भेटलो होतो. तेव्हा आम्ही दोघांनी पहिल्या डेटवर लग्नाबद्दल बातचीत केली होती. आम्हाला दोघांनाही लग्न करायचे नव्हते. जवळपास ४ वर्षांच्या डेटिंगनंतर आम्हाला जाणवले की, लग्न एक चांगला विचार आहे कारण आम्हाला एकत्र राहायचे होते. तिचे आई बाबा पुढील पाऊल टाकण्यासाठी उत्सुक होते. मला आनंद आहे की मी हा निर्णय घेतला.

मिलिंद म्हणाला की, तो त्याच्या जीवनात अशा गोष्टी करतो जो त्यांच्या नात्यासाठी चांगले काम करेल. जर तुम्ही सपोर्ट करतात तर संबंध वाढू शकतात. जर असे केले नाही जात तर नात्यात काही तरी समस्या आहे. 

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवरने बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २२ एप्रिल, २०१८ ला लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर हे कपल बऱ्याचदा चर्चेत येत असते.

टॅग्स :मिलिंद सोमण अंकिता कुंवर