मिका सिंगची जामीनावर सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 15:36 IST
मिका सिंगच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सिंगिंग सेन्सेशन मिका सिंगला दिल्ली पोलिसांनी एका डॉक्टरला चपराक मारल्याविषयी अटक केली ...
मिका सिंगची जामीनावर सुटका
मिका सिंगच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सिंगिंग सेन्सेशन मिका सिंगला दिल्ली पोलिसांनी एका डॉक्टरला चपराक मारल्याविषयी अटक केली होती. त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.तो म्हणाला,‘ मी निरपराध आहे. म्हणून माझी सुटका झाली. लोकांना सर्व खरं कळालं याचा मला आनंद होतोय. त्याची सुटका झाल्यावर सर्व चाहत्यांनी त्याच्याभोवती सेलिब्रेशन करायला सुरूवात केली. त्याने सर्व चाहत्यांचे आभार मानले. चाहत्यांचा पाठिंबा आणि प्रार्थना यांच्यामुळेच मी तुरूंगातून सुटू शकलो.