Join us  

Video: धो-धो पावसात मिकाची गाडी खराब झाली, अर्ध्या रात्री मदतीसाठी ‘मुंबई’ धावली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 11:29 AM

अर्ध्या रस्त्यात मिकाची गाडी बंद पडली. रस्त्यावरचे लोक त्याच्या मदतीसाठी धावून आले. एक -दोन नाही तर बघता बघता तब्बल 200 लोक जमले.

ठळक मुद्देमिका आणि आकांशा राहुल वैद्यच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये गेले होते. जवळपास रात्री 3 वाजता ते पार्टीमधून घरी परतत होते.

मिका सिंग (Mika Singh) हा तरूणाईचा आवडता सिंगर. त्याची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. याचा पुरावा शनिवारी रात्री मुंबईच्या पावसात मिळाला. होय, मुंबईत धो-धो पाऊस सुरू असताना अर्ध्या रात्री रस्त्यावर मिकाची कार बंद पडली. मग काय, शेकडो लोक त्याच्या मदतीसाठी धावले. अक्षरश: स्वत: पावसात भिजत या लोकांनी मिकाची मदत केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मिका तर लोकांचे हे प्रेम पाहून अक्षरश: भारावला आहे.या व्हिडीओमध्ये मिका गाडीत बसलेला दिसतोय. त्याच्यासोबत अभिनेत्री आकांशा पुरी देखील आहे आणि जवळपास 200 लोक पावसात भिजत त्याची मदत करत आहेत.

मिका आणि आकांशा राहुल वैद्यच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये गेले होते. जवळपास रात्री 3 वाजता ते पार्टीमधून घरी परतत होते. मुंबईचे रस्ते पावसाने तुडूंब भरले होते. अशात मिकाच्या गाडीनं दगा दिला. अर्ध्या रस्त्यात त्याची गाडी बंद पडली.  जोरदार पाऊस आणि रस्त्यावर साचलेलं पाणी त्यामुळं मिकाला गाडीबाहेरही पडता येईना. बघता बघता अशावेळी रस्त्यावरचे लोक त्याच्या मदतीसाठी धावून आले. एक -दोन नाही तर तब्बल 200 लोक जमले. स्वत: पावसात भिजत त्यांनी मिकाची मदत केली. त्याच्या गाडीला धक्का दिला आणि गाडी सुरु झाली.  लोकांची ही मदत पाहून मिका प्रचंड प्रभावित झाला. आमची कार खराब झाली होती. पण पाहा, किती लोक मदत करण्यासाठी आलेत. कमीत कमी 200 लोक मदतीसाठी धावले. या सर्वांचे आभार, अशा शब्दांत मिकानं सर्वांचे आभार मानलेत.सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने मिकाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

टॅग्स :मिका सिंग