मिका बनणार सारेगामापाचा जज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 10:09 IST
बॉलिवूड पार्श्वगायक मिका सिंह लवकरच सारेगामपा या रिअॅलिटी शोचा जज म्हणून दिसणार आहे. सुमारे तीन वर्षांनंतर सारेगामपा सिंगींग रिअॅलिटी शो ...
मिका बनणार सारेगामापाचा जज
बॉलिवूड पार्श्वगायक मिका सिंह लवकरच सारेगामपा या रिअॅलिटी शोचा जज म्हणून दिसणार आहे. सुमारे तीन वर्षांनंतर सारेगामपा सिंगींग रिअॅलिटी शो पुन्हा छोट्या पडद्यावर येत आहे. गायक आणि अभिनेता आदित्य नारायण हाच पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा होस्ट म्हणून दिसेल. मिका आपल्या या नव्या भूमिकेसाठी प्रचंड उत्साहित आहे. या कार्यक्रमाचा जज होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी या नव्या भूमिकेसाठी प्रचंड उत्सूक आहे, असे मिका म्हणाला.