Join us  

मिया खलिफाने गुपचूप उरकले लग्न? समोर आला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 11:43 AM

एकेकाळी पॉर्न स्टार राहिलेली मिया खलिफाने नुकतीच तिचे लग्न पुढे ढकलण्यात  आल्याची माहिती दिली होती.

ठळक मुद्दे मियाने 2011 मध्ये तीन महिने पॉर्न चित्रपटांत काम केले होते.

एकेकाळी पॉर्न स्टार राहिलेली मिया खलिफाने नुकतीच तिचे लग्न पुढे ढकलण्यात  आल्याची माहिती दिली होती. कोरोना संकटामुळे लग्न पुढे ढकल्यात आल्याचे तिने म्हटले होते. पण आता एक वेगळीच बातमी आहे. होय, तिची ताजी पोस्ट वेगळीच कहाणी सांगतेय. मियाने सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती तिचा पती  रॉबर्ट सँडबर्गसोबत दिसत आहे.

व्हिडीओत मिया बाथरोब घालून घरात मस्ती करत फिरताना दिसतेय तर तिचा पती रॉबर्ट सोफ्यावर बसलेला आहे. खरे तर हा एक नॉर्मल व्हिडीओ म्हणता येईल. पण या व्हिडीओला मियाने दिलेले कॅप्शन मात्र लक्षवेधी आहे. होय, माझा पती सुट्टीच्या दिवशी माझ्यासोबत असा हँगआऊट करतोय, असे तिने लिहिले आहे. मियाने रॉबर्टसाठी पती या शब्दाचा वापर केला आहे. यावरून मियाने लॉकडाऊनच्या काळात गुपचूप लग्न उरकल्याचे मानले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच मियाने सोशल मीडियावर तिचे लग्न पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली होती. तिचे लग्न जूनमध्ये होणार होते. पण कोरोनामुळे जगभर माजलेला हाहाकार बघता, तिने आपले लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता कदाचित तिने सीक्रेट मॅरेज केले असावे, असे दिसतेय.यावर्षी मार्च महिन्यात मियाने रॉबर्टसोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. तिचे हे दुसरे लग्न आहे़  याआधी तिने 2011 मध्ये आपल्या शालेय मित्रासोबत लग्न केले होते. 5 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

  मियाने 2011 मध्ये तीन महिने पॉर्न चित्रपटांत काम केले होते. त्यावेळी पॉर्न वेबसाइट्सवर सर्वाधिक पाहिली गेलेली अडल्ट स्टार बनली होती. पण नंतर तिने पॉर्न इंडस्ट्री सोडली आणि एक स्पोर्ट अँकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ती आजही सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. तिचा पती रॉबर्ट हा स्वीडनचा असून तो एक शेफ आहे.

टॅग्स :बॉलिवूड