Join us  

#MeToo : अमिताभ बच्चन यांचा #MeTooला पाठींबा! असरानी म्हणाले, मोहिम गंभीरपणे घेऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 1:11 PM

‘मीटू’ मोहिम बॉलिवूडमध्ये आगीसारखी पसरत असताना आणि या आगीत आलोक नाथ, नाना पाटेकर, विकास बहल, रजत कपूर अशा अनेकांची नावे पोळली जात असताना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी मात्र एक वेगळेच मत मांडले आहे. 

मीटू’ मोहिम बॉलिवूडमध्ये आगीसारखी पसरत असताना आणि या आगीत आलोक नाथ, नाना पाटेकर, विकास बहल, रजत कपूर अशा अनेकांची नावे पोळली जात असताना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी मात्र एक वेगळेच मत मांडले आहे. होय, ‘मीटू’ निव्वळ बकवास आहे. ती गंभीरपणे घेण्याचे कारण नाही, असे असरानी यांनी म्हटले आहे. माझा महिलांना पाठींबा आहे. पण ही ‘मीटू’ मोहिम प्रसिद्धी लाटण्याचा, फिल्म प्रमोशनचा एक भाग आहे. ही मोहिम मुळातचं निरर्थक आहे. त्यामुळे तिला गंभीरपणे घेण्याची गरज नाही. यामुळे केवळ आणि केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीचे नुकसानचं होतेय, असे असरानी यांनी म्हटले आहे.दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादावर बोलणे टाळले होते. यावर तनुश्री दत्ताने नाराजीही व्यक्त केली होती. काही बडे स्टार्स केवळ नावाने बडे असतात. ते महिला सुरक्षेच्या मुद्यावर चित्रपट बनवतात, रिलीजपूर्वी महिला सुरक्षेवर गळा काढून बोलतात. पण ठोस भूमिका घ्यायची वेळ आली की मागे हटतात, असे तनुश्री म्हणाली होती. तिचा इशारा अमिताभ यांच्याकडे होता. पण आता अमिताभ ‘मीटू’ मोहिमेवर बोलले आहेत. या मोहिमेचे समर्थन करत, कुणालाही कुठल्या महिलेसोबत गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही. कामाच्या ठिकाणी तर अजिबात नाही. अशा मुद्यांवर त्वरित आवाज उचलून कायदेशीर मदत घेऊन आरोपीला शिक्षा द्यायला हवी. कामाच्या ठिकाणी महिलांना आदर मिळत नसेल तर हा एक अक्षम्य गुन्हा आहे, असे ‘मीटू’चे समर्थन करताना अमिताभ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनमीटू