Join us  

#MeToo : अजय देवगण म्हणाला, महिलांशी गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 12:25 PM

तनुश्री दत्ताने अनेक महिलांना लैंगिक छळ, शोषण व गैरवर्तनाबद्दल बोलण्याचे बळ दिले. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेचे वादळ उठले आहे.

ठळक मुद्देमहिलांना सर्वोच्च सन्मान देण्यामध्ये विश्वास ठेवतो - अजय देवगण

तनुश्री दत्ताने अनेक महिलांना लैंगिक छळ, शोषण व गैरवर्तनाबद्दल बोलण्याचे बळ दिले. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेचे वादळ उठले आहे. यात अनेक सिनेकलाकारांवर आरोपांची मालिका सुरु असून अशा प्रकारचे आरोप लावणाऱ्या महिला कलाकारांना देखील इंडस्ट्रीतून पाठिंबा मिळतो आहे. यात बॉलिवूडमध्ये मीटू मोहीमेला खूप सपोर्ट मिळत असून आमीर खान, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांनी मीटू मोहिमेत आरोप करण्यात आलेल्या व्यक्तींसोबत काम करण्यास नकार दिला आहे. कलाकारांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे जास्त प्रमाणात समर्थन मिळते आहे. 

बॉलीवूड सुप्रसिद्ध एक्टर्स आमिर खान,अक्षय कुमार प्रतिसादानंतर आता अजय देवगनने सुद्धा ट्वीट शेअर करत या मोहिमेस समर्थन केले आहे. अजय देवगनने ट्विटमध्ये लिहिले की, बॉलिवूडमध्ये जे काही होत आहे. त्यामुळे मी फार दुःखी आहे. माझी कंपनी व मी महिलांना सर्वोच्च सन्मान देण्यामध्ये विश्वास ठेवतो, जर कुठल्याही महिलेच्या बाबतीत कोणीही गैरवर्तन करत असेल तर मी माझी कंपनी अशा व्यक्तीला पाठीशी घालणार नाही.तनुश्रीने २००८ साली हॉर्न ओके प्लिज च्या सेटवर तिच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांनी अश्लिल व्यवहार केला. तर कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासह दिग्दर्शक राकेश सारंग तसेच निमार्ता सामी सिध्दीकी यांनी त्यांना साथ दिली असे म्हटले होते. याप्रकरणी त्या चौघांनी सिंटाकडे चुकीची माहिती देत त्यांची दिशाभुल केल्याचे तनुश्रीचे म्हणणे होते. त्यानुसार ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तनुश्रीच्या वकिलांनी सिंटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना एक लेखी पत्र दिले. या पत्रात तनुश्रीसोबत २००८ साली नेमके काय घडले याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सिंटाच्या वरिष्ठ अधिका-यांनी आमच्याकडे एका लेखी पत्राची मागणी केली होती. त्यानुसार आम्ही एक पत्र त्यांना दिले आहे, अशी माहिती तनुश्रीचे वकिल नितीन सातपुते यांनी दिली.

 

टॅग्स :अजय देवगणमीटू