Join us  

#MeToo : मला मसाज करण्यास भाग पाडलं, 'या' अभिनेत्रीचा सुभाष घर्इंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 11:15 AM

‘मीटू’अंतर्गत आरोप झेलणा-यांत दिग्दर्शन सुभाष घर्इंचेही नाव आहे. एका अज्ञात महिलेने सुभाष घर्इंवर कथितरित्या बलात्काराचा आरोप ठेवला होता. आता अभिनेत्री केट शर्मा ही सुद्धा सुभाष घर्इंविरोधात मैदानात उतरली आहे. 

मीटू’अंतर्गत आरोप झेलणा-यांत दिग्दर्शन सुभाष घर्इंचेही नाव आहे. एका अज्ञात महिलेने सुभाष घर्इंवर कथितरीत्या बलात्काराचा आरोप केला होता. आता अभिनेत्री केट शर्मा ही सुद्धा सुभाष घर्इंविरोधात मैदानात उतरली आहे. सुभाष घर्इंनी अलीकडे माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केट शर्माने केला असून याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.‘गत ६ आॅगस्टला सुभाष घर्इंनी मला मसाज देण्यासाठी बोलवले. मी गेले तेव्हा तिथे अन्य पाच-सहा जण आधीच हजर होते. मी त्यांना मसाज दिला. त्यांना मसाज दिल्यानंतर मी हात धुवायला निघाले असताना सुभाष घई माझ्या मागे आले आणि माझ्याशी बोलायचे आहे म्हणून मला एका खोलीत नेले़ तिथे त्यांनी मला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला,’ असा केट शर्माचा आरोप आहे. याविरोधात तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.याआधी एका महिलेने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिग्दर्शक सुभाष घर्इंवर बलात्काराचा आरोप केला होता. ‘गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी ते मला सोबत घेऊन जात. अनेकदा ते मला घरी सोडविण्यासाठी येत. तेव्हा ते माज्या मांडीवर हात ठेवत. चांगले काम केल्याबद्दल अनेकदा ते मला मिठी मारत असत. त्यांच्या लोखंडवाला येथील घरी त्यांचे कुटुंबिय राहात नसत. त्यामुळे   ते मला बोलवत. त्यावेळी ते माज्याशी अतिशय असभ्य वर्तन करात. पण त्यावेळी मला कामाची गरज होती आणि मी मी त्यांच्यासोबतचे काम सोडू शकत नव्हते. एक दिवस म्युझिक सेशन झाल्यानंतर त्यांनी मद्यसेवन केले. मलाही त्यांनी बळजबरीने मद्य दिले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये बसवले. ते मला घरी सोडत आहेत, असेच मला वाटले. पण त्यांनी मला एका हॉटेलमध्ये नेले आणि माझ्यावर अतिप्रसंग केला. मी रडले आणि विरोधही केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी त्यांनी मला घरी सोडले.   मी काही दिवस कामावर जाणे टाळले. मात्र मी मधेच काम सोडले तर पैसे मिळणार नाहीत असे त्यांनी सांगितल्याने मला पुन्हा कामावर जावे लागले,’असे या महिलेने म्हटले होते. दरम्यान सुभाष घइंर्नी बलात्काराचा हा आरोप फेटाळून लावला होता.  

टॅग्स :मीटू