Join us  

बजेट वाचवण्यासाठी कंगना राणौतची खर्चात कपात, भारावली एकता कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 9:14 PM

कंगना राणौत सध्या भलेही नकारात्मक बातम्यांमुळे चर्चेत आहे. पण काहींना यामुळे काहीही फरक पडत नाही. यापैकीचं एक नाव म्हणजे एकता कपूर. 

कंगना राणौत सध्या भलेही नकारात्मक बातम्यांमुळे चर्चेत आहे. पण काहींना यामुळे काहीही फरक पडत नाही. यापैकीचं एक नाव म्हणजे एकता कपूर. एकता कपूरच्या ‘मेंटल है क्या’मध्ये आधीच कंगनाची वर्णी लागली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कंगनासोबत काम करून एकता जणू कंगनाची फॅन झालीय. कंगना आपल्यासारखी जिगरबाज आणि धीट असल्याचे एकताचे मत आहे. कंगना व एकतामध्ये अनेक बाबतीत साम्यही आहे़च. दोघीही अगदी रसरसून, कुणाचीही पर्वा न करता बिनधास्त जगतात. दोघीही तितक्याच समर्पणवृत्तीने कामही करतात. आता कंगनाच्या प्रेमात पडण्यासाठी एकताला आणखी एक कारण मिळाले आहे.

होय, ‘मेंटल है क्या’चा बजेट कंट्रोल करण्याची जबाबदारी कंगनाने म्हणे आपल्या खांद्यावर घेतलीय या चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटींगसाठी लंडन प्रचंड महागडे शहर आहे, याची जाणीव होताच कंगनाने म्हणे, पंचतारांकित हॉटेल सोडण्याचा निर्णय घेतला. केवळ इतकेच नाही तर पैसे वाचवण्यासाठी आपल्या स्टाफ मेंबर्सच्या संख्येतही कपात केली. साहजिकचं कंगनाच्या या निर्णयाने एकता कमालीची सुखावलीय. कंगनासारखी मोठी स्टार चित्रपटाचा बजेट वाचवण्यासाठी आपल्या सुखसोयींशी तडजोड करतेयं म्हटल्यावर तिलाही भरून आले. नुकताचं एकताचा ‘लैला मजनू’ फ्लॉप झाला. या दबावात कंगनासारख्या स्टारने इतका मनाचा इतका मोठेपणा दाखवावा, ही गोष्ट एकताला बरीच अपील झाली. आतली बातमी खरी मानाल तर, कंगनाचा हा सच्चेपणा पाहून तिने आपल्या आणखी एका चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय. आता फक्त एकता व कंगनाची जोडीतील हे नवे मैत्र किती दिवस टिकते, तेच केवळ बघायचेय.तूर्तास कंगना ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ऐन शेवटच्या टप्प्यात या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कंगनाने स्वीकारलीय. पण याचमुळे सोनू सूदसारख्या कलाकाराने तिचा चित्रपटाला रामराम ठोकलाय.

टॅग्स :कंगना राणौतएकता कपूरमेंटल है क्या