Join us

पुरुषांना बॉडी प्रदर्शनाचे स्वातंत्र्य, स्त्रियांना का नाही?; अभिनेत्री इशा गुप्ताचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 06:37 IST

बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता वेब सिरिज ‘आश्रम ३’मुळे सध्या चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे हॉट फोटो प्रेक्षकांच्या मनात कायम आग लावण्याचे काम करतात.

बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता वेब सिरिज ‘आश्रम ३’मुळे सध्या चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे हॉट फोटो प्रेक्षकांच्या मनात कायम आग लावण्याचे काम करतात. हॉट सिन्स, फोटोजवर तिने एका मुलाखतीत आपले परखड मत व्यक्त केले आहे.

एखाद्या स्त्रीसोबत कोणी छेडछाड केली तरी तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. बाहेरील जगात, चित्रपटात वा अन्य माध्यमांवर पुरुष आपल्या उत्थान बॉडीचे प्रदर्शन करतात. परंतु, त्यांना याबाबत कुणीच प्रश्न विचारत नाहीत. मग, स्त्रियांनी बोल्ड सिन्स केले, हॉट फोटोज् अपलोड केले तर तिला संस्काराची परिभाषा शिकवली जाते. 

‘विक्रम वेधा’ ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शनासाठी सज्ज!प्रसिद्ध भारतीय पौराणिक कथा ‘विक्रम-वेताळ’ या विषयाचे आधुनिक रूपांतरण असलेल्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचे चित्रीकरण आटोपले असून, हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आर. माधवन व विजय सेतुपती अभिनित तामीळ ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हा रिमेक असून, यात माधवनने साकारलेली भूमिका सैफ अली खान तर विजय सेतुपतीने साकारलेली भूमिका हृतिक रोशन साकारत आहे.

टॅग्स :ईशा गुप्ता