Join us

​‘मेट गाला २०१७’: प्रियांका चोप्राचा घेरदार ‘घागरा’ ठरला ‘ब्रेकिंग न्यूज’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 11:20 IST

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जिथे जाईल, तिथे सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. हॉलिवूडमधून दहा दिवसांच्या सुट्टीवर भारतात आली, तेव्हाही ...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जिथे जाईल, तिथे सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. हॉलिवूडमधून दहा दिवसांच्या सुट्टीवर भारतात आली, तेव्हाही प्रियांकाने माहौल केला आणि आता भारतातून परत हॉलिवूडमध्ये परतली, तेव्हाही प्रियांकाचा माहौलच. होय, मेट गाला २०१७ च्या रेड कार्पेटवर प्रियांका उतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. रेड कार्पेटवरील आपल्या लूकने तिने सगळ्यांनाच अवाक् केले. प्रियांका चोप्रा पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिला मेट गालामध्ये एन्ट्री मिळालीयं.या इव्हेंटमध्ये हॉलिवूडचे काही निवडक सेलिब्रिटी सामील होतात. त्या अर्थानेही प्रियांकाचे या इव्हेंटमध्ये सामील होणे अधिक लक्षवेधी ठरले. यावेळी प्रियांकाने आपल्या लॉन्ग ट्रेंच कोचने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. लॉन्ग ट्रेंच कोच, ब्लॅक बुट्स, डोळ्यांवरचा स्मोकी मेकअप आणि कानात मोठे ईअर रिंग या अवतारात प्रियांका अतिशय हॉट दिसत होती. आपल्या या सेक्सी लूकने प्रियांकाने हॉलिवूडमधील अनेक मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकले. प्रियांकाचा हा ट्रेंच कोच राल्फ लॉरेनने डिझाईन केलेला होता. खरे तर असा ड्रेस घालून रेड कार्पेटवर उतरणे कुठल्या आव्हानापेक्षा कमी नव्हते. पण प्रियांकाने अतिशय आत्मविश्वासाने हा ड्रेस कॅरी केला .  रेड कार्पेटवर प्रियांका अमेरिकन संगीतकार निक जोनस याच्यासोबत दिसून आली. खुद्द निक जोनसही प्रियांकाना हा घेरदार ‘घागरा’ पाहून काही वेळासाठी दचकला.ALSO READ : ​‘नेपोटिझम’वर बोलली प्रियांका चोप्रा; मला चित्रपटातून अक्षरश: हाकलून लावले गेले...!प्रियांकाच्या या घेरदार ड्रेसवर पाय पडू नये, म्हणून तो पूर्णवेळ काळजी घेताना दिसला. पण प्रियांका मात्र कमालीची कॉन्फिडन्ट होती. एकंदर काय तर, प्रियांकाने ती खºया अर्थाने ग्लोबल स्टार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. एॅमी व आॅस्कर सोहळ्यानंतर मेट गालामध्येही तिने स्वत:चा जलवा दाखवलाच!