Join us  

सुपर डान्सरच्या स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून रेखा यांना आली या अभिनेत्याची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 6:00 AM

रेखा यांची सुपर डान्सरमध्ये उपस्थिती लाभल्यामुळे त्यांच्या सदाबहार गाण्यांवर स्पर्धक परफॉर्मन्स सादर करणार आहेत.

ठळक मुद्देतेजसचा हा परफॉर्मन्स आणि त्याचा वावर पाहून रेखा यांना एका अभिनेत्याची आठवण आल्याची त्यांनी कबूल केले. त्याला पाहाताच त्यांना शाहरुख खानची आठवण आली.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो. येत्या आठवड्यात या कार्यक्रमात अभिनेत्री रेखा हजेरी लावणार आहेत. 

 रेखा यांची सुपर डान्सरमध्ये उपस्थिती लाभल्यामुळे त्यांच्या सदाबहार गाण्यांवर स्पर्धक परफॉर्मन्स सादर करणार आहेत. नऊ वर्षांचा तेजस वर्मा आणि तुषार शेट्टी यांनी ‘रंग बरसे’ या रेखा यांच्या प्रसिद्ध गाण्यावर केलेले सादरीकरण रेखा यांना खूप आवडले आणि यामुळे त्या जुन्या आठवणींमध्ये रमल्या. तसेच त्यांनी या दोघांचे भरभरून कौतुक केले.

तेजसचा हा परफॉर्मन्स आणि त्याचा वावर पाहून रेखा यांना एका अभिनेत्याची आठवण आल्याची त्यांनी कबूल केले. त्याला पाहाताच त्यांना शाहरुख खानची आठवण आली. त्या म्हणाल्या, “तेजसचे हसणे अगदी शाहरुख सारखेच आहे. तेजसचे डोळे आणि ओठांची ठेवण पाहाता तो अगदीच शाहरुख सारखा दिसतो. तो खूप चांगला डान्सर आहे. तो ज्या पद्धतीने नृत्य करतो ते कल्पनेपलीकडचे आहे. त्याच्यासमोर परफॉर्म करायचे असल्यास मला आणखी काही जन्म घ्यावे लागतील.

 तसेच तेजसचे गुरू तुषार शेट्टीचे कौतुक करताना रेखा यांनी सांगितले की, “तेजस ही तुझ्या भविष्याची किल्ली आहे, तो तुला खूप पुढे घेऊन जाणार आहे.”

 सुपर डान्सर या कार्यक्रमात रेखा यांच्यासोबत या कार्यक्रमाचे परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर, कार्यक्रमातील स्पर्धक आणि सुपर गुरू ‘सलाम ए इश्क’ आणि ‘रंग है रसिला’ या त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत.

 ज्येष्ठ अभिनेती रेखा यांना  ‘सुपर डान्सर 3’ मध्ये प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी, रात्री आठ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :रेखासुपर डान्सर