Join us  

'तान्हाजी'मध्ये कामही न करता या मराठमोळ्या अभिनेत्याचा आहे चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 5:40 PM

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या यशामागे एका मराठी कलाकाराचा विशेष हात आहे.

ठळक मुद्देआशिष पाथाडेने या चित्रपटातील कलाकारांची भाषा, ते साकारणारी पात्रं, त्यांचा अभिनय, त्यांचा पडद्यावरील वावर हे सारे बारकावे टिपण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. 

अजय देवगणच्या ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 10 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला, यावरून याचा अंदाज यावा. हा चित्रपट अजय देवगणचा 100 वा चित्रपट आहे. अजयने यात मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपूर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या यशामागे एका मराठी कलाकाराचा विशेष हात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, त्याने या चित्रपटात काम केलेले नाहीये. या कलाकाराचे नाव आशिष पाथाडे असून त्याने या चित्रपटातील कलाकारांची भाषा, ते साकारणारी पात्रं, त्यांचा अभिनय, त्यांचा पडद्यावरील वावर हे सारे बारकावे टिपण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. 

ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आशिषने सांगितले की, मी अजय सर, काजोल मॅम, शरद, नेहा यांना भाषेतील उच्चारशुद्धतेसाठीचे, तसेच त्या काळातील व्यक्तिरेखांच्या वावरासंबंधी प्रशिक्षण दिले. अजय सर, काजोल मॅम हे बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार असले तरी त्यांनी नेहमीच मी काय सांगतो याकडे लक्ष दिले. 

आशिषने याआधी अजहर, बँजो, ठाकरे यांसारख्या चित्रपटांतील कलाकारांना देखील त्यांच्या भूमिकेसाठी मार्गदर्शन दिले आहे. आशिष हा स्वतः देखील अभिनेता असून त्याने चित्रफीत, कँडल मार्च यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ठाकरे या चित्रपटात मियादाँदच्या भूमिकेत तो झळकला होता. 

 

टॅग्स :तानाजीअजय देवगणकाजोल