Join us  

मान्यता दत्तने केले होते सी-ग्रेड चित्रपटांत काम, संजय दत्तने एका रात्रीत गायब केल्या होत्या सीडी-डीव्हीडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 11:15 AM

अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त हिचा आज (22 जुलै) वाढदिवस. 2008 साली संजयने मान्यतासोबत लग्न केले. पण या मान्यताचे खरे नाव कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तिचे खरे नाव आहे दिलनवाज शेख.

ठळक मुद्देमान्यता आणि संजय दत्तची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले.

अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त हिचा आज (22 जुलै) वाढदिवस. 2008 साली संजयने मान्यतासोबत लग्न केले. पण या मान्यताचे खरे नाव कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तिचे खरे नाव आहे दिलनवाज शेख. 22 जुलै 1979 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. पण  ती लहानाची मोठी झाली ती दुबईत. मान्यताला मोठी अभिनेत्री बनायचे होते. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने आपले नाव सारा खान ठेवले. फिल्म इंडस्ट्रीत तिला याच नावाने ओळखले जायचे. पण प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तिने आपले नाव पुन्हा बदलले आणि मान्यता हे नवे नाव धारण केले.

मान्यता यावेळी संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजयचे सारे काम तीच सांभाळते. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली.

मान्यताच्या वडिलांचा दुबईत बिझनेस होता. पण त्यांच्या मृत्यूनंतर घराची संपूर्ण जबाबदारी मान्यतावर आली. याचमुळे तिच्या फिल्मी करिअरला ब्रेक लागला. ती फॅमिली बिझनेसमध्ये गुंतली.

मान्यताला एक मोठी अभिनेत्री बनायचे होते. पण अनेक प्रयत्न करूनही तिला कुठलाच मोठा चित्रपट आॅफर झाला नाही. यामुळे मान्यताने बी आणि सी ग्रेड चित्रपटांत काम करणे सुरु केले.  प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तरी आपल्याला काम मिळेल, अशी तिची अपेक्षा होती. पण असे काहीही झाले नाही.

   मान्यता आणि संजय दत्तची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. संजयच्या प्रेमात पडल्यावर मान्यताने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. मान्यताने   ‘लव्हर्स लाइक अस’ या सी ग्रेड चित्रपटात काम केले आहे, हे संजयला ठाऊक होते. त्याला ते आवडत नव्हते. त्यामुळेच संजय दत्तने मान्यताच्या या चित्रपटाचे राइट्स 20 लाखांत खरेदी केले. या चित्रपटाच्या मार्केटमधील सीडी आणि डीव्हीडी हटवण्यासाठी त्याने आपली सगळी शक्ती पणाला लावली. 

2008 मध्ये संजय व मान्यताने लग्न केले. त्यावेळी मान्यता 29 वर्षांची होती तर संजय 50 वर्षांचा. 2010 मध्ये  मान्यताने शरान व इकरा या जुळ्या मुलांना जन्म दिला. सध्या संजय व मान्यता आपल्या संसारात आनंदी आहेत.

टॅग्स :संजय दत्त