Join us

मानुषी छिल्लर नाही झळकणार करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर २' मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 13:44 IST

नुकतीच अशी बतमी होती की मिस वर्ल्ड २०१८  विजेती मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि ती मोस्ट ...

नुकतीच अशी बतमी होती की मिस वर्ल्ड २०१८  विजेती मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि ती मोस्ट अवटेड फिल्म स्टुडंट ऑफ द इयर २ मध्ये झळकणार आहे. ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी सगळीकडे पसरत असताना कारण जोहरने या गोष्टीचे खंडन केले आहे.  सुत्रानुसार करण आणि मानुषीची भेट मिस इंडियाच्या एका कार्यक्रमात झाली होती. तेव्हाच करण तिच्या सुंदऱ्यांने  आणि तिच्या आत्मविश्वासाने प्रभावित झाला होता. त्याने तिला स्वतःच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आणण्याची तयारी सुरू केली पण या बाबतीत त्याला विचारले असता त्याने ही चुकीची बातमी आहे असे सांगितले. रेमंड क्रॉसवर्ड बुक अॅवॉर्डच्या दरम्यान करणने मीडियाला सांगितले की "ही बातमी खोटी आहे की मी मानुषीला घेऊन चित्रपट करत आहे, हो आम्ही भेटलो होतो ती ज्या शोची विजेती झाली होती त्या शो चा होस्ट मी होतो तेव्हा आमची भेट झाली होती. मानुषीमध्ये चांगली क्षमता आहे तिला पुन्हा भेटायला मला आवडेल. पण जेव्हा पासून ती मिस वर्ल्डचा खिताब जिंकली तेव्हापासून माझी आणि तिची भेट नाही झाली आणि अजूनपर्यंत आम्ही चित्रपटाबाबत काहीच चर्चा सुद्धा केली नाही.ALSO READ :  ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर बॉलिवूडच्या दिशेने! टायगर श्रॉफच्या गर्लफ्रेन्डला केले रिप्लेस!!करण जोहरने जरी ही बातमी खोटी असल्याची सांगितली आहे तरी पण जेव्हा मानुषीचा विषय निघतो तेव्हा तो तिची भरभरून स्तुती करत असतो. यावरून असा अंदाज येतो की करणच्या डोक्यात कुठे ना कुठे त्याच्या आगामी चित्रपटासाठी  मानुषीचे नाव फिरते आहे. आता 'स्टुडंट ऑफ द इयर'चा मागच्या वर्षी फर्स्ट लुक रिलीज केला गेला होता त्यात अभिनेता टायगर श्रॉफ स्टुडंट च्या लुक मध्ये दिसला होता पण अजून ह्या चित्रपटासाठी अभिनेत्री ची निवड झाली नाही आहे. मध्ये असे ऐकण्यात आले होते की ह्या चित्रपटासाठी चंकी पांडे ची मुलगी अनन्या पांडे चा विचार चालू आहे पण ह्यावर अजून शिक्कामोर्तब झाले नाही आहे.