Join us

Manoj Bajpayee: अभिनेता मनोज वाजपेयीवर कोसळला दु:खाचा डोंगर, हरपलं आईचं छत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 13:17 IST

मनोज वाजपेयीच्या आईची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Manoj Bajpayee Mother Death: बॉलिवूडचा अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee)च्या  कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. पद्मश्री मनोज बाजपेयी यांच्या आई गीता देवी यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. गीता देवी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गीता देवी यांचे आज सकाळी म्हणजेच गुरुवारी निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. गेल्या एका आठवड्यापासून गीता देवी यांच्यावर दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर आणि मॅक्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्या प्रकृतीत काही दिवसांपूर्वी सुधारणा दिसून आली होती.मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांचं निधन झाले. मनोज बाजपेयी यांच्या वडिलांचे एका वर्षापूर्वीच निधन झालं.त्यानंतर एक वर्षांनी अभिनेत्याच्या आईचं देखील निधन झालं.

आईच्या निधनानंतर मनोजसह तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अशोक पंडित यांनी आपल्या ट्विटद्वारे ही माहिती सर्वांना दिली आहे. अशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही ही माहिती दिली आहे.  

 

         

टॅग्स :मनोज वाजपेयीसेलिब्रिटी