Join us  

अच्छा सिला दिया तूने...! कालापानी वादात मनीषा कोईरालाचा नेपाळला पाठींबा, संतापले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:10 PM

लिपुलेख आणि कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा नेपाळने प्रकाशित केला आहे. आता या वादात मनीषा कोईराला हिनेही उडी घेतली आहे. 

ठळक मुद्देएका युजरने तर ‘दीदी, तू आमचा देश सोडून गेलीस तर चांगले होईल,’ असे मनीषाला सुनावले.

भारत आणि नेपाळ यांच्या लिपुलेख, कालापानीसंदर्भातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. लिपुलेख आणि कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा नेपाळने प्रकाशित केला आहे. आता या वादात नेपाळी वंशाची बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिनेही उडी घेतली आहे. होय, मनीषाने नेपाळ सरकारच्या या नकाशाचे समर्थन करणारे ट्विट केले आहे. विशेष म्हणजे, तिच्या या ट्विटने सोशल मीडियावर एका नव्या ‘युद्धा’ला तोंड फोडले आहे.

मनीषाने नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्याचे ट्विट रिट्विट करत नेपाळ सरकारचे आभार मानलेत. ‘ आपल्या छोट्याशाा देशाचा गौरव ठेवल्याबद्दल आभार. मी  (भारत, नेपाळ आणि चीन) तिन्ही महान देशांमध्ये शांततापूर्ण व सन्मानजनक चर्चेची अपेक्षा व्यक्त करते,’ असे ट्विट तिने केले.मनीषाने हे ट्विट करताच तिच्या या ट्विटवर कमेंटचा पाऊस पडला. अनेक बॉलिवूड चाहत्यांनी या वादग्रस्त मुद्यावरून मनीषाला ट्रोल करणे सुरु केले.

‘भारतात ओळख बनवणा-या तुझ्यासारखी अभिनेत्री या मुद्यावर भारताऐवजी नेपाळचे समर्थन करतेय. भारतीय चित्रपटसृष्टीने तुला प्रसिद्धी-पैसा दिला. त्याचे मोल तू असे चुकवणार?’ असे एका युजरने यावर लिहिले़ तर एका युजरने यावरून मनीषाला चांगलेच फैलावर घेतले. 

‘अशा लोकांना स्टारडम देणेच चुकीचे आहे. अशा लोकांना संधी देऊन आपण आपल्या देशांच्या लोकांचा अधिकार हिसकावला. आता तरी जागे व्हा. अशा बाहेरच्यांना संधी देण्याऐवजी आपल्या देशवासियांना संधी द्या,’अशा शब्दांत या युजरने आगपाखड केली.

एका युजरने तर ‘दीदी, तू आमचा देश सोडून गेलीस तर चांगले होईल,’ असे मनीषाला सुनावले.

काय आहे वाद

भारताने लिपुलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे.  भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. लिपूलेख पास मागार्मुळे कैलाश मानसरोवरला जाणा-्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार आहे. भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या या मार्गावर आता नेपाळने आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता नेपाळ लिपुलेख आणि कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा प्रकाशित केला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी हा नकाशा प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :मनिषा कोईरालानेपाळ