मनिषा कोईराची ‘लेडी बॉडिगार्ड’ला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:35 IST
स्टार्सने बॉडिगार्ड ठेवणे काही नवीन नाही. बॉडिगार्ड धिप्पाड शरीराचा असेल तर त्याला देखील प्रसिद्धीचे वलय प्राप्त होते. मात्र मनिषा ...
मनिषा कोईराची ‘लेडी बॉडिगार्ड’ला पसंती
स्टार्सने बॉडिगार्ड ठेवणे काही नवीन नाही. बॉडिगार्ड धिप्पाड शरीराचा असेल तर त्याला देखील प्रसिद्धीचे वलय प्राप्त होते. मात्र मनिषा कोईरालाने पुरुष बॉडिगार्ड या संकल्पनेला फाटा देत महिला 'लेडी बॉडिगार्ड'ची नियुक्त केली आहे. महिला सशक्तीकरणाचा नवा संदेशच तिने या माध्यमातून दिला आहे. अन्य सेलिब्रिटींनीही असा प्रयोग करायला हवे, असे तिचे म्हणणे आहे. मनिषाने आपले नवीन लूक असलेला फोटो ट्विटरवरून पोस्ट केला असून त्याच वेळी हा संदेशही दिला आहे.