Join us

मंगलुरूत अद्याप 'दिलवाले' दिसलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:59 IST

'दिलवाले' चित्रपट अलीकडेच सर्वत्र प्रदर्शित झाला. मात्र अद्याप तो मंगलुरूमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला नाही. मंगलुरूमध्ये तीन ठिकाणी हा चित्रपट ...

'दिलवाले' चित्रपट अलीकडेच सर्वत्र प्रदर्शित झाला. मात्र अद्याप तो मंगलुरूमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला नाही. मंगलुरूमध्ये तीन ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. काही लोकांनी दगडफेक करून या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ दिले नाही. चित्रपटाचे पोस्टर्सही या जमावाने फाडून टाकले होते.शाहरुख खानने देशातील वाढत्या असहिष्णुतेविषयी केलेल्या भाष्यामुळे हा विरोध करण्यात आला. ट्विटरवरून या चित्रपटाविरोधात मोहीम राबविण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या विद्या दिनकर म्हणाल्या, ''मी तक्रार केल्यानंतरच पोलिसांनी बजरंग दलाचा निमंत्रक शरण पंपवेलविरुद्ध एफआयआर दाखल केले. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. येथे पोलीस प्रशासनापेक्षा प्रक्षोभक जमावच वरचढ ठरत आहेत, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळेच हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही.''