Join us

ममता बॅनर्जींवर ‘बाघिणी’ सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 08:08 IST

सध्या आपल्याकडे बायोपिकचा ट्रेंडच आला आहे. मेरी कॉम ते बाजीराव पेशवा, लोकमान्य टिळकांपासून ते गोपीनाथ मुंडेंपर्यंत बायोपिक तयार झाले ...

सध्या आपल्याकडे बायोपिकचा ट्रेंडच आला आहे. मेरी कॉम ते बाजीराव पेशवा, लोकमान्य टिळकांपासून ते गोपीनाथ मुंडेंपर्यंत बायोपिक तयार झाले आहेत. त्यात आता प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही सामावेश होणार आहे.लवकरच ममता बॅनर्जींच्या जीवनावर आधारित ‘बाघिणी’ (वाघीण) नावाचा सिनेमा तयार होत आहे. नेहल दत्ता याचे दिग्दर्शन करणार आहेत. तीन वर्षांच्या रिसर्चमधून त्यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे. लेख, चरित्रग्रंथ, बातम्यांच्या आधारे त्यांनी ममता बॅनर्जींचे आयुष्य जाणून घेतले.एवढी मेहनत घेऊनही ते म्हणतात की, मला बायोपिक नाही तर सर्व महिलांना प्रेरित करण्यासाठी एका कर्तृत्ववान स्त्रीची गोष्ट म्हणून हा सिनेमा तयार करायचा आहे. एक महिला संघर्ष आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व संकटांचा सामाना करून एवढी मोठी कामगीरी करू शकते याचे उदाहरण म्हणजे ममता बॅनर्जी.बंगालमध्ये होणाऱ्या निवडणूकीपूर्वी हा सिनेमा प्रदर्शत केला जाणार आहे. कोणत्याही राजकीय पार्टीचा थेट उल्लेख सिनेमात केला गेला नाहीए. कथा जरी खऱ्या व्यक्तीवर आधारित असली तरी कोणत्याही प्रकारे राजकीय चित्रपट होणार नाही याची मी संपूर्ण काळजी घेतली आहे, अशी माहिती नेहल दत्ता यांनी दिली.