Join us  

छोटी ‘पू’ बनणार डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंगची हिरोईन !!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 6:00 AM

बॉलिवूडचा आघाडीचा ‘खलनायक’ डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतोय, ही बातमी आम्ही आधीच तुम्हाला दिली होती. रिंजिंगच्या या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचे नाव असणार आहे, ‘स्कॉड’.

ठळक मुद्दे‘स्कॉड’ या चित्रपटाची कथा एका लहान मुलीच्या अवती-भवती फिरणारी आहे. ही मुलगी एका कटाची शिकार ठरते, असे याचे ढोबळ कथानक आहे.

बॉलिवूडचा आघाडीचा ‘खलनायक’ डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतोय, ही बातमी आम्ही आधीच तुम्हाला दिली होती. रिंजिंगच्या या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचे नाव असणार आहे, ‘स्कॉड’.या चित्रपटात रिंजिंग जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. खुद्द डॅनी यांनी अलीकडे एका मुलाखतीत या बातमीवर शिक्कामोर्तब केले होते.

रिंजिंगला अखेर एक स्क्रिप्ट आवडलीय आणि यामुळे मी प्रचंड आनंदात आहे. आमचा मुलगा बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छितो, ही आमच्या कुटुंबासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी रिंजिंगला त्याच्या डेब्यूसाठी कुठल्याही प्रकारे मदत केलेली नाही. फिल्ममेकिंग एक खूप मोठी प्रक्रिया असते आणि कलाकार याचा छोटाचा भाग असतात. या सगळ्यांत रिंजिंग आपले स्थान निर्माण करेल, जे काही करेल, त्याला पूर्ण न्याय देईल, असा मला विश्वास आहे, असे डॅनी म्हणाले होते. आता रिंजिंगच्या या डेब्यू सिनेमाबद्दल एक ताजी बातमी आहे. ती म्हणजे, या चित्रपटाच्या हिरोईनचे नाव ठरलेय.

होय, दिग्गज अभिनेत्री अनीता राज हिची पुतणी मालविका राज या चित्रपटाची हिरोईन असणार आहे. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात पू उर्फ पूजा शर्मा अर्थात करिना कपूरच्या बालपणीची भूमिका मालविकाने साकारली होती.

‘स्कॉड’ या चित्रपटाची कथा एका लहान मुलीच्या अवती-भवती फिरणारी आहे. ही मुलगी एका कटाची शिकार ठरते, असे याचे ढोबळ कथानक आहे. रिंजिंग यात धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. ज्योति दास कपूर हा चित्रपट दिग्दर्शित करतेय. दिग्दर्शक म्हणून ज्योतीचा हा डेब्यू सिनेमा आहे. यापूर्वी ज्योतीने दोन शॉर्ट फिल्म्स बनवल्या. आता ज्योतीने एक अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट बनवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. आता हे आव्हान ती आणि रिंजिंग कसा पेलतात, ते बघूच.

टॅग्स :डॅनी डेन्झोपा