मल्लिका शेरावत देतेय कोणाला पाठिंबा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 17:16 IST
शूटिंग अथवा इतर कामानिमित्त नेहमीच अमेरिकेच्या दौऱ्यावर जात असलेल्या अभिनेत्री मल्लिका शेरावतने डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ...
मल्लिका शेरावत देतेय कोणाला पाठिंबा?
शूटिंग अथवा इतर कामानिमित्त नेहमीच अमेरिकेच्या दौऱ्यावर जात असलेल्या अभिनेत्री मल्लिका शेरावतने डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना समर्थन दिले आहे. मल्लिकाने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन, संगीतकार स्टीव्ह वंडर आणि अभिनेत्री सॅमुएल एल. जॅक्सन यांच्यासोबत ती दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहले की, ‘माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांना भेटण्याचा मला सन्मान मिळाला. मला या परिवाराचा आदर आहे. त्यामुळे हिलरी यांच्यासाठी मी प्रार्थना करीत आहे. यानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. खरं तर मल्लिका ही तिच्या वक्तव्यांपेक्षा बोल्डनेसमुळेच अधिक चर्चेत राहिली आहे. परंतु आता तिने थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेतल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या मल्लिका अमेरिकेतच असून, हिलरी यांनी तिने पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेची निवडणूक प्रचारापेक्षा सोशल मीडियावरच अधिक गाजत असल्याने मल्लिकाची ही पोस्ट सर्वार्थाने महत्त्वपूर्ण समजली जाते. मल्लिकाच्या या पोस्टला तिच्या अमेरिकन फॅन्सकडूनही समर्थन मिळत असल्याने मल्लिका भलतीच खूश झाली असल्याचे सूत्राने सांगितले. हिलरी यांनी गेल्या बुधवारी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अंतिम डिबेटमध्ये बाजी मारली होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारणे अमान्य केल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. येत्या आठ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.