मल्लिकाची लगीनघाई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 16:30 IST
‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत सध्या सिरले आॅक्सेनफॅन्स या फ्रेंच उद्योगपतीच्या प्रेमात आकंठ बुडालीयं आणि मोरपंखी दिवसांचा मन:पूर्वक आनंद घेतेयं. ...
मल्लिकाची लगीनघाई...
‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत सध्या सिरले आॅक्सेनफॅन्स या फ्रेंच उद्योगपतीच्या प्रेमात आकंठ बुडालीयं आणि मोरपंखी दिवसांचा मन:पूर्वक आनंद घेतेयं. ताज्या बातमीनुसार, मल्लिका व सिरले दोघेही लग्नगाठीत अडकण्यासाठी उतावीळ आहे. एकमेकांसोबत बराच वेळ घालवल्यानंतर मल्लिका व सिरले यांनी आपले नाते जाहीर केले. यावर्षी ‘व्हॅलेन्टाईन डे’ला सिरले याने मल्लिकाला एक महागडी कार गिफ्ट दिली होती. या जोडप्याने आता गंभीरपणे लग्नाबाबत विचार चालवला आहे. तेव्हा मल्लिका कधी शुभवार्ता देते, ते बघूयात!!.......................................................मल्लिकाचे डेटींग डेटींग सुरू...आपल्या बोल्ड, बिनधास्त भूमिकांसाठी ओळखली जाणारी ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत सध्या कुठे आहे हो? अहो, कुठे काय, मज्जेत आहे...आणि का नसावे...बेबी प्रेमात पडलीय...होय. मल्लिका सध्या सिरले आॅक्सेनफॅन्स या फ्रेंच उद्योगजकाच्या प्रेमात आकंठ बुडालीयं म्हणे.. त्याच्यासोबत सध्या ती डेटींग डेटींग खेळतेयं.(?) आपल्या प्रियकरासोबतचे एक छायाचित्र नुकतेच या हॉट गर्लने इन्स्टाग्रामवर शेअर केले. प्रेमात पडणे ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, असे तिने या फोटोखाली लिहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. ‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटातून ती शेवटची पडद्यावर दिसली होती. लवकरच ती ‘लॉस्ट टॉम्ब’ या हॉलिवूडपटात पाहायला मिळणार आहे...मज्जा आहे ना मग मल्लिकाची...!!!