Join us  

बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत दिसली मलायका अरोरा, तिच्या हॉट ड्रेसवर खिळल्या सर्वांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 2:39 PM

सुपर हॉट लुक; मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत बहीण अमृताच्या घरी पोहोचली होती.

ठळक मुद्देमलायका आता 47 वर्षांची  आहे आणि तिला 19 वर्षांचा एक मुलगा आहे, ज्याचे नाव आहे अरहान खान.

मलायका अरोराने ( Malaika Arora) वयाची चाळीशी कधीच ओलांडलीये. पण या वयातही मलायका प्रचंड फिट आहे. स्टाईल स्टेटमेंटच्या बाबतीतही बॉलिवूडची ही मुन्नी एक पाऊल पुढे आहे. नुकतीच मलायका बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत बहीण अमृता अरोराच्या घरी पोहोचली. यावेळी मलायकाच्या ड्रेसवर सर्वांच्याच नजरा खिळल्या. तिचा हॉट लूक पापाराझींनी कॅमे-यात कैद केला. (Malaika Arora spotted  in mumbai with boyfriend Arjun Kapoor)

मलायका यावेळी व्हाईट ऑफ शोल्डर वनपीसमध्ये दिसली. अभिनेत्रीचा हा लुक आतापर्यंतचा सर्वात सेक्सी कॅज्युअल लुक असल्याचे म्हटले जातेय. याआधीही अनेकदा मलायका या ड्रेसमध्ये दिसली आहे.

2017 मध्ये तिने हा ड्रेस पहिल्यांदा घातला होता. त्यावेळी तिने या ड्रेससोबत सिल्व्हर स्रीकर कॅरी केले होते. यानंतर 2018 साली पुन्हा हाच ड्रेस तिने रिपीट केला होता. मित्रांसोबतच्या डिनर पार्टीसाठी तिने हा ड्रेस निवडला होता. त्यावेळी मात्र तिने हाय हिल्स घातल्या होत्या. अलीकडे मलायकाने पुन्हा हाच ड्रेस ट्राय केला.

मलायका आता 47 वर्षांची  आहे आणि तिला 19 वर्षांचा एक मुलगा आहे, ज्याचे नाव आहे अरहान खान. अलीकडे मलायकाने  पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुपर डान्सर 4 शोमध्ये  अंशिका राजपूतचा डान्स पाहून मलायकाने मुलीची इच्छा व्यक्त केली होती.मला एक मुलगी हवी होती. मला मुलगी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. जिच्यासोबत मी माझा मेकअप, शूज आणि कपडे शेअर करू शकेल, असे ती म्हणाली होती. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचेही म्हटले जातेय. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर