Join us  

सुपरहॉट! 26 वर्षानंतर रॅम्पवर उतरला मिलिंद सोमण; पाहून मलायकाही स्वत:ला रोखू शकली नाही... 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:39 AM

Super Model of The Year Season2 : लोकप्रिय अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण 26 वर्षानंतर रॅम्पवॉकवर उतरला आणि त्याला पाहून सगळेच थक्क झालेत.

ठळक मुद्देयाआधी मिलिंदने अलिशा चिनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या गाण्यात असाच कारनामा केला होता. या गाण्यानंतर मिलिंद रातोरात सेन्सेशन बनला होता.

लोकप्रिय अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) 26 वर्षानंतर रॅम्पवॉकवर उतरला आणि त्याला पाहून सगळेच थक्क झालेत. टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अगदी मलायका अरोराही (Malaika Arora) मिलिंदला पाहून हैराण झाली होती. ती देखील स्वत:ला रोखू शकली नाही. तिने पण हूटींग करत, हातानं हार्ट इमोजी बनवत मिलिंदला चीअर केलं.

‘सुपर मॉडल ऑफ द इअर’च्या सीझन 2 दरम्यान मिलिंदचा हा जलवा पाहायला मिळाला. नुकताच याचा प्रोमो रिलीज झाला. या प्रोमो मिलिंद सोमण ‘मेड इन इंडिया’ या गाण्यावर रॅम्पवॉक करताना दिसतोय. धोतर नेसून तो रॅम्पवर उतरला.

मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरही हा प्रोमो शेअर केला आहे. ‘26 वर्षानंतर पुन्हा एकदा...,’ या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडीओवर मिलिंदची पत्नी अंकितानेही कमेंट केली आहे. नव-याच्या हॉट लूकवर ती सुद्धा फिदा झाली. ‘प्रत्येकवेळी इतकं हॉट दिसणं लीगल कसं आहे?’, अशी कमेंट तिने केली. याआधी मिलिंदने अलिशा चिनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या गाण्यात असाच कारनामा केला होता. या गाण्यानंतर मिलिंद रातोरात सेन्सेशन बनला होता. मिलिंदचा हाच चार्म आजही कायम आहे, असं म्हणायला हरकत नाही.

चाहतेही थक्कमिलिंद सोमणचा हा हॉट व सुपरफिट अवतार पाहून चाहतेही थक्क झालेत. अनेक चाहत्यांनी त्याच्या या लुकचं कौतुक केलं. 26 वर्षांपूर्वी जितका हॉट दिसायचास, आजही तितकाच हॉट दिसतोस, असे एका चाहत्याने लिहिलं.   ‘भावा,तुझ्याकडे आम्हालाही हेवा वाटतो,’अशी कमेंट एका चाहत्याने केली.

टॅग्स :मिलिंद सोमण मलायका अरोरा