Join us

Video: जाता जाता मलायका अरोराने केला इशारा, सोशल मीडियावर रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 15:00 IST

सध्या मलायकाचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

ठळक मुद्देसध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करतेय. दोघेही लवकरच लग्न करणार असे मानले जातेय.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेस फ्रिक मानली जाते. अभिनेत्री मलायका अरोराचा हॉटनेस आणि फिटनेस दोन्ही चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे हॉट फोटो टाकून मलायका एकीकडे चाहत्यांना घायाळ करते, दुसरीकडे तिचे फिटनेस व्हिडीओ पाहून लोकांना कुतूहल वाटते. सध्या मलायकाचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. यात मलायका फोटोग्राफर्सना इशारा करताना दिसतेय.नेहमीप्रमाणे मलायकाचा हा व्हिडीओही जिमबाहेरचा आहे. यात ती जिममध्ये जाताना दिसतेय. मलायका कारमधून उतरले आणि फोटोग्राफर्सच्या कॅमेºयांची क्लिक क्लिक सुरु होते. पण मलायका गुड मॉर्निंग म्हणून आपल्याच तो-यात पुढे निघते. मात्र काही अंतर पुढे गेल्यावर ती मागे वळते आणि फोटोग्राफर्सना मास्क लावण्याचा इशारा करते.

बॉलिवूड पॅप नावाच्या इन्स्टा पेजवरून शेअर करण्यात आलेला हा  व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसची थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे सर्वाधिक 32 रूग्ण आढळून आले आहेत. अशास्थितीत नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहे. मलायकानेही फोटोग्राफर्सला सावध केले. आता तिच्या या सल्ल्याचा फोटोग्राफर्सवर किती असर होतो, ते बघूच.

सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करतेय. दोघेही लवकरच लग्न करणार असे मानले जातेय. अर्थात अद्यापही या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. चर्चा खरी मानाल तर अर्जुन कपूरने या लग्नासाठी टाळाटाळ चालवली आहे. अद्याप लग्नाची योग्य वेळ आलेली नाही, असे त्याचे मत आहे.

टॅग्स :मलायका अरोरा