Join us  

इतना मेकअप? रानू मंडलपाठोपाठ नेटक-यांनी उडवली मलायका अरोराची खिल्ली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 3:48 PM

रोज नवे फोटो शेअर करण्यात आघाडीवर असलेली मलायका सध्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

ठळक मुद्देयापूर्वीही अनेकदा मलायका तिच्या वयावरून ट्रोल झाली आहे.

मलायका अरोराची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. कधी आपल्या फिटनेसमुळे, कधी लव्हलाईफमुळे तर कधी आपल्या फॅशन स्टेटमेंटमुळे ती सतत चर्चेत असते. मलायका सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह सोशल मीडिया युजर आहे आणि तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट एकापेक्षा एक आकर्षक फोटोंनी भरलेले आहे. रोज नवे फोटो शेअर करण्यात आघाडीवर असलेली मलायका सध्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.होय, काही तासांपूर्वीच मलायकाने हा फोटो शेअर केला. काही लोकांनी हा फोटो पाहून मलायकाची प्रशंसा केली. पण अनेकांनी तिला ट्रोल केले.

होय, तिचा फोटोतील हेवी मेकअप लूक अनेकांना आवडला नाही. ‘तुझ्या चेह-यावर मेकअप आहे की, तू मेकअपवर आहेस?’ असा खोचक सवाल मलायकाला ट्रोल करताना एका युजरने केला. इतके मेकअप करूनही एक गोष्ट लपता लपत नाही, असे म्हणत एका युजरने मलायकाच्या वयाकडे लक्ष वेधले.

काही दिवसांपूर्वी सिंगर रानू मंडल ही सुद्धा हेवी मेकअपलूकमुळे अशीच ट्रोल झाली होती.यापूर्वीही अनेकदा मलायका तिच्या वयावरून ट्रोल झाली आहे. चाळीशी ओलांडलेली मलायका तिच्यापेक्षा कितीतरी वर्षे लहान अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली, तेव्हाही लोकांनी मलायकाला असेच ट्रोल केले होते. पण मलायकाला या ट्रोलिंगने जराही फरक पडला नाही. कदाचित पुढेही पडणार नाही.

मलायकाच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. वयाच्या 45 व्या वषीर्ही फिटनेसच्या बाबतीत सर्वात पुढे असणारी अभिनेत्री म्हणून तिचे नाव घेतले जाते. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करतेय. हे कपल लवकरच लग्न करणार, असे मानले जातेय. काही महिन्यांपूर्वी मलायका व अर्जुनने आपले नाते जगजाहिर केले होते.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर