Join us  

चक्क पँट घालायला विसरली मलायका अरोरा, फोटो पाहून चाहते आवाक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 7:30 PM

अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या कुटुंबानेही त्यांच्या नात्याचा स्वीकार केला आहे. दोघेही अनेकदा फॅमिली फंक्शन्स, डिनर, लंचमध्ये एकत्र दिसतात.

मलायका अरोरा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकदा तर ती फक्त तिच्या ड्रेसींमुळेच जास्त पब्लिसिटी मिळवताना दिसते. टके आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाईल कायमच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. नुकतीच मलायका मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली.मलायका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना मीडिया फोटोग्राफरने तिला घेरले. जेव्हा फोटोग्राफर मलायकाचे फोटो क्लिक करत होते, त्यावेळी अभिनेत्री ड्रेसींगमुळेच थोडी अनकंम्फर्टेबल दिसली. कारण फोटोग्राफर्सना पाहताच हातांनी ड्रेस सावरताना दिसली. यावेळी तिने ब्लॅक अँड व्हाइट लाइनिंग असलेला लाँ कुर्ता परिधान केला होता. मात्र, मलायकाला पाहून क्षणभर असे वाटले की, ती पँट घालायलाच विसरली की काय?  

मात्र तरीही मलायकाने मीडियासमोर एक से बढकर एक पोज दिल्या.मलायका अरोरा तिच्या बोल्ड ड्रेससोबतच बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी, नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये तिने बेडरुमचे रहस्ये अतिशय मनोरंजक पद्धतीने शेअर करताना दिसली होती. तिची ही स्टाईल पाहून फक्त नेहा धुपियाच नाही तर बहीण अमृता अरोरा देखील आश्चर्यचकित झाली. मुलाखतीदरम्यान जेव्हा तिला विचारण्यात आले की, तिला कोणत्या प्रकारची मुले आवडतात.यावर तिने उत्तर दिले की तिला दाढी ठेवणारे आणि मनमौजी मुले आवडतात. पती अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराचे नाव अर्जुन कपूरसोबत जोडले जात आहे. दोघांनीही अफेअरची कबुलीही दिली आहे.

आता अर्जुन आणि मलायकाच्या कुटुंबानेही त्यांच्या नात्याचा स्वीकार केला आहे. दोघेही अनेकदा फॅमिली फंक्शन्स, डिनर, लंचमध्ये एकत्र दिसतात. इतकेच नाही तर मलायकाचा १८ वर्षीय मुलगा अरहाननेही अर्जुन कपूरला स्विकारले असल्याचे बोलले जाते. काही वर्षांपूर्वी मलायका अरोरानेही अर्जुन कपूरसोबत तिच्या लग्नाचा प्लॅन शेअर केला होता. ख्रिश्चन रितीरिवाजानुसार समुद्रकिनाऱ्यावर लग्न करण्याची तिची ईच्छा असल्याचे तिने सांगितले होते. अर्जुनहा सगळ्याच गोष्टीत परफेक्ट असल्याचे मलायकाला वाटते. मलायकाने करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये कबूल केले होते की तिला अर्जुन कपूर आवडतो. त्याचबरोबर दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे गोडवे गाताना दिसतात. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर