Join us  

birthday special ; ‘त्या’ एका चुकीच्या निर्णयाने संपले महिमा चौधरीचे फिल्मी करिअर...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 9:24 AM

‘परदेस’ या चित्रपटामुळे एका रात्रीतून स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. आज (१३ सप्टेंबर) हा महिमाचा वाढदिवस. 

‘परदेस’ या चित्रपटामुळे एका रात्रीतून स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. आज (१३ सप्टेंबर) हा महिमाचा वाढदिवस. पहिल्याच सिनेमात महिमाला बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. बॉक्सआॅफिसवरही महिमाचा पहिला डेब्यू सिनेमा यशस्वी ठरला. पण या यशाचा तिच्या करिअरला फारसा फायदा झाला नाहीच. गेल्या अनेक वर्षांपासून महिमा बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. सध्या ती इतकी बदललीयं, की तिला ओळखणेही कठीण आहे.

तुम्हाला क्वचितचं माहित असेल की, महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी आहे. महिमाने आपले मॉडेलिंग करिअर ऋतू चौधरी नावानेच सुरु केले होते. पण सुभाष घर्इंनी ‘परदेस’ सिनेमात तिला कास्ट केले आणि त्यांनीच तिचे महिमा असे नामकरणही केले. ‘परदेस’ सिनेमापूर्वी एका जाहिरातीत महिमा झळकली होती. या जाहिरातीत महिमाला पाहून सुभाष घई यांनी आपल्या चित्रपटात संधी दिली होती. बॉलिवूडच्याच नव्हे तर महिमाच्या पर्सनल लाईफमध्येही अनेक चढउतार आले. फ्लॉप करिअर, लग्नापूर्वीची प्रेग्नेंसी, लिएंडर पेससोबतचे अफेअर अशा एक ना अनेक गोष्टींमुळे महिमा चर्चेत राहिली.

महिमा चौधरीने २००६ साली मुंबईतील आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यांतच तिने मुलीला जन्म दिला. महिमा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती, अशी चर्चा यानंतर रंगली. पण आता महिमा बॉबीपासून विभक्त झाली आहे. २०१३ मध्ये बॉबी आणि महिमा विभक्त झाले. आता महिमा सिंगल मदर आहे.

लिएंडर पेस याच्यासोबतचे महिमाचे अफेअर चांगलेच गाजले होते. पण महिमाचे मानाल तर पेसने तिला दगा दिला. ‘डार्क चॉकलेट’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी महिमाने लिएंडर पेससोबतच्या नात्याविषयी खुलासा केला होता. लिएंडर एक उत्कृष्ट टेनिस प्लेअर आहे. मात्र व्यक्ती म्हणून तो अजिबात चांगला नाही. त्याच्या आयुष्यात दुसरं कुणी आहे, हे कळल्यावर मला मोठा धक्का बसला होता. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही. उलट मी आधीपेक्षा अधिक प्रगल्भ झाले आहे, असे महिमा म्हणाली होती.२००५ मध्ये महिमासोबत रिलेशनशिपमध्ये असताना संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लईसोबतही लिएंडरची जवळीक वाढली होती. महिमासोबत ब्रेकअप झाल्यावर लिएंडरने रियासोबत लग्न केले. पण पुढे या दोघांचाही घटस्फोट झाला.

सिंगल मदर झाल्यावर खर्च चालवण्यासाठी महिमाने रिअ‍ॅलिटी शो केलेत. अनेक इव्हेंटला ती जावू लागली. यामुळे बॉलिवूडचे तिचे करिअर संपुष्टात आले. रिअ‍ॅलिटी शो करणे माझी खूपमोठी चूक होती, असे ती म्हणाली होती.

टॅग्स :महिमा चौधरीलिएंडर पेस