मुलगी आलियाच्या सेल्फी लूक समोर महेश भट्टचा सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 18:02 IST
कोणत्याही बापाला आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अभिमान वाटावा ही मानवाची स्वाभाविक क्रिया आहे. मात्र, ज्यांना सदैव लाईमलाईटमध्ये राहण्याची सवय ...
मुलगी आलियाच्या सेल्फी लूक समोर महेश भट्टचा सेल्फी
कोणत्याही बापाला आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अभिमान वाटावा ही मानवाची स्वाभाविक क्रिया आहे. मात्र, ज्यांना सदैव लाईमलाईटमध्ये राहण्याची सवय झाली आहे अशांना देखील हा मोह आवरता येत नाही. आपल्या मुलीचा जाहिरातीवरचा फोटो पाहून बापाला सेल्फी घेण्याचा मोह आवारता येत नाही, याची प्रचिती बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता महेश भट्ट यांचा एका फोटो पाहिल्यावर होते. बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनयाच्या बळावर स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आलियाने केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. स्टारपुत्री असल्याने स्टारडम तिला लवकरच मिळाले. आकर्षक चेहरा असल्याने अनेक कं पन्यांचे ब्रॅण्ड अँड्रॉर्समेंट देखील ती करीत आहे. एका मोठ्या मोबाईल कंपनीसाठी तिने केलेल्या जाहिरातीचे फलक देशभरात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. एका हायवेवर लावण्यात आलेल्या मोबाईल कंपनीचे प्रचार फलक आलियाचे वडील महेश भट्ट यांनी पाहिले. त्याचवेळी ते कारमधून उतरले व या फलकासमोर उभे राहून त्यांनी सेल्फी घेतला. हा महेश भट्ट यांचा फनबॉय मुव्हमेंट होता असे म्हणायला हरकत नाही. आलिया भट्ट हिने आपल्या वडिलांनी घेतलेला सेल्फ ी शेअर केला आहे. यावर तिने कॅप्शन दिले आहे, जेव्हा माझ्या वडिलांचा सेल्फी, माझा स्वत:चा सेल्फी घेताना कोणती शक्यता अधिक आहे. आलिया भट्ट हिचा मागील वर्षी प्रदर्शित झालेला डिअर जिंदगी हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला असून, या चित्रपटासाठी तिची प्रशंसा केली जात आहे. यावर्षी ती ‘बद्रीनाथ की दुल्हनियाँ’ या चित्रपटात वरुण धवनसोबत दिसणार आहे.